अंबरनाथ तालुक्यातील रहिवाशांच्या आयुष्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने पाण्याची टाकी बांधली. मात्र नळाला पाणी येण्याऐवजी लोकांना डोंगरातील अशुद्ध पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. भरपावसाच्या काळात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत असून अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.