मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये पाच दिवस लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेरीस आपलं उपोषण सोडलं आहे. मराठा समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडलं. यावेळी मनोज जरांगे भावुक झाले आणि अश्रूच्या धारा वाहू लागल्या. हे पाहून मराठा बांधवही भावुक झाले होते.