मुंबई : सध्या अनेक तरुणाई नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायाकडे वळत आहे. त्याच प्रवाहात ग्रँट रोड परिसरातील पूजा खैरे हिने दहा वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर आपल्या आई वसंती खैरे यांच्या जुन्या खानावळीला आधुनिक स्वरूप देत ‘पोटभर किचन’ या नावाने क्लाऊड किचन सुरू केले. आई वसंती खैरे यांच्याकडे खानावळी चालवण्याचा अनुभव होता, तसेच त्यांनी घरगुती मराठी शिकवण्याचे क्लासेस घेतले आणि घरोघरी जाऊन नर्सरीसंबंधी कामे केली, तसेच घरगुती डबे बनवण्याचं कामही चालवत होत्या. या अनुभवातून आणि आपल्या स्वतःच्या कॉर्पोरेट सेव्हिंग्जचा उपयोग करून पूजाने हा व्यवसाय सुरू केला