मुंबई: फक्त बाराशे पन्नास रुपयांत सुरू झालेला मसाल्यांचा छोटासा व्यवसाय आज मोठ्या स्तरावर झेपावला आहे. हा यशस्वी प्रवास तरुण उद्योजक स्वप्निल टकले यांचा आहे. फाईन आर्ट्समध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कुटुंबातील घरगुती व्यवसायाला नवा आयाम दिला. मसाला उद्योगातून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.