दिवाळीच्या सण हा नात्याचा उत्सव समजला जातो. अशाच एका राजकीय कुटुंबाने दीपोत्सवात एकत्र येऊन फॅमिलीही कधीही मोठी आणि महत्त्वाची असते हे दाखवून दिलं. निमित्त होतं मनसेचा दीपोत्सव. यंदाच्या मनसे दीपोत्सवाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. आज मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या वतीने दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब हजर होतं. यावेळी राज ठाकरे यांच्या मातोश्रींना सगळे जण एकत्र आल्याचं पाहून डोळे पाणावले होते. ठाकरे कुटुंबासाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता.