बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.त्यात आज संतोष देशमुख यांची हत्या होऊन 19 दिवस उलटले आहेत.मात्र अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आज संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये मोर्चा काढला आहे. या दरम्यान सुरेश धस यांनी आज वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचावर निशाणा साधला. तुम्ही बीड मध्ये येऊन सुद्धा मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या घरी का गेला नाहीत? तुम्ही त्यांचा परिवाराला भेट का दिली नाही? असा सवाल सुरेश धस यांनी केला.