रायचंद शिंदे, प्रतिनिधी, खेड: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमाच्या फ्लेक्स वर चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा फोटो पाहण्यास मिळाला आहे. अजित पवार खेड विधानसभा मतदार संघात आज विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असून यावेळी अजित पवार तालुक्यातील कडूस इथं शेतकरी मेळावा घेत आहेत आणि या मेळाव्याच्या बॅनर वरती अमोल कोल्हे यांचा फोटो दिसल्याने चर्चेला उधाण आलं आहे.