सोलापूर - ब्रिटिश राजवटीच्या काळात नरसिंह चकोते यांनी आंध्रप्रदेश येथून सोलापुरात येऊन मटन भाजनालयाचा व्यवसाय सुरू केलेला व्यवसाय आजही सोलापूर शहरातील पेंटर चौकात सुरू आहे. वयाच्या 81 व्या वर्षी देखील मल्हारी नरसिंह चाकोते पुढे नेण्याचा काम करत आहे.चाकोते यांच्या मटन भाजनालयामध्ये खवय्यांची शिक कढई बनवून घेण्यासाठी व खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. तर या व्यवसायातून महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.