सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आल्याने नदी काठची गाव, शेती पाण्याखाली गेली. मोठ्या कष्टाने वडिलांनी 4 एकरात कांदा, ऊस, मका आणि आंब्याची लागवड केली होती.शाळा सुरू झाल्यावर नवीन दप्तर,वह्या शालेय साहित्य घेऊन दिले होते. पण या पुरामध्ये सर्व काही वाहून गेलं आहे.सीना नदीला आलेल्या महापुराचा थरार मोहोळ तालुक्यातील आष्टी गावात राहणाऱ्या वैभवने सागितलं.