Astro Tips: अनेकांना वाटतं यात आपलं शहाणपण! पण 'या' चुका भविष्यात सतत पश्चाताप करायला लावतात

Last Updated:

Astrology Marathi: ज्योतिष शास्त्रानुसार आपण जसं काही वागतो, त्यामुळे एकतर ग्रह कमकुवत किंवा मजबूत होत असतात. तुमच्या चांगल्या किंवा वाईट सवयी एकतर तुम्हाला ग्रह दोषातून मुक्त करू शकतात किंवा तुम्हाला ग्रहदोष लावू शकतात.

News18
News18
मुंबई : पुढच्या जन्मावर अनेकांचा विश्वास असतो-नसतो, पण आपण करत असलेल्या कर्मांचा नक्की आपल्यावर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार आपण जसं काही वागतो, त्यामुळे एकतर ग्रह कमकुवत किंवा मजबूत होत असतात. तुमच्या चांगल्या किंवा वाईट सवयी एकतर तुम्हाला ग्रह दोषातून मुक्त करू शकतात किंवा तुम्हाला ग्रहदोष लावू शकतात. वाईट गोष्टी, कोणत्या लोकांचा अपमान केल्याने तुमच्या कुंडलीत कोणता ग्रह कमकुवत होऊ शकतो हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ग्रह कमकुवत झाल्यामुळे जीवनात अडचणी, आर्थिक नुकसान, आजारपण आणि अपमानाती परिस्थिती वाढू शकते. जाणून घेऊया कोणाचा अपमान केल्याने कोणते नुकसान होते आणि कोणत्या ग्रहाचा दोष लागतो.
या वाईट सवयी सोडा -
आजारी, गरीब किंवा मजुराचा अपमान करणे - शनी हा न्यायाचा कारक आहे आणि कर्माचे फळ देतो. आपल्याकडून कोणावर अन्याय होतो, आजारी, गरीब किंवा मजुराचा अपमान केला जातो, तेव्हा शनी देव क्रोधित होतात. असे करणाऱ्या व्यक्तीला शनी दोष लागतो ज्यामुळे आयुष्यात संघर्ष वाढत जातो. अशी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते आणि मेहनतीचे योग्य फळ मिळवण्यात अपयशी ठरते.
advertisement
उशिरा झोपणे, उशिरा उठणे आणि वडिलांचा अपमान करणे -
सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्वाचा कारक ग्रह आहे. सूर्यदेवाच्या कृपेने चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. ज्या व्यक्ती रात्री उशिरापर्यंत जागतात, सकाळी उशिरापर्यंत झोपतात, अशा लोकांचा सूर्य कमकुवत होतो. जी व्यक्ती आपल्या वडिलांचा अपमान करते, त्यांना अपशब्द बोलते किंवा त्यांच्याशी नाहक वाद घालते, तिचा सूर्य कमकुवत होतो. कुंडलीत सूर्य कमकुवत असल्याने व्यक्तीचा प्रत्येक ठिकाणी अपमान होतो, व्यक्ती आळशी बनते. अशी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि नोकरीतही अडचणी येतात.
advertisement
कोणाबद्दलही मत्सर किंवा ईर्ष्या करणं - दुसऱ्यांबद्दल मत्सर किंवा जळण्याची भावना ठेवल्याने कुंडलीतील राहूची स्थिती खालावते, ज्यामुळे व्यक्तीला भ्रम, तणाव आणि मानसिक अशांती सहन करावी लागते. अशा परिस्थितीत मन साफ ठेवा आणि कोणाशीही स्वतःची तुलना करू नका किंवा जळण्याची भावना ठेवू नका.
वृद्धांचा अपमान केल्याने लागतो या ग्रहाचा दोष - गुरू बृहस्पती हा ज्ञान, सन्मान आणि भाग्य वाढवणारा ग्रह आहे. ज्या घरात वृद्धांचा अपमान केला जातो, त्या घरातील लोकांच्या कुंडलीत गुरू ग्रह कमकुवत होतो. इतकेच नाही तर आपल्या गुरूंचा, शिक्षकांचा किंवा कोणत्याही अनोळखी वृद्धांचा अपमान करणेसुद्धा महागात पडू शकते. गुरू दोष लागल्यामुळे बुद्धी भ्रष्ट होऊ शकते, करिअरमध्ये अडचणी येतात आणि गरजेच्या वेळी नशिबाची साथ मिळत नाही.
advertisement
प्राण्यांना मारणे किंवा त्रास देणे - प्राण्यांना मारणे किंवा त्यांना त्रास देणे यामुळे कुंडलीतील केतूचा दोष वाढतो. केतू हा अध्यात्म आणि चांगल्या गुणांचा कारक आहे. प्राण्यांना विनाकारण मारणे, त्यांना लाथ मारणे, त्रास देणे किंवा त्यांना उपाशी ठेवणे यामुळे केतू कमकुवत होतो आणि केतूदोष लागतो. यामुळे मन अशांत राहते. अचानक मोठे नुकसान आणि मानसिक तणावाची स्थिती निर्माण होते. घरातील भांडणे वाढतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Generated image
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astro Tips: अनेकांना वाटतं यात आपलं शहाणपण! पण 'या' चुका भविष्यात सतत पश्चाताप करायला लावतात
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement