Dussehra 2025: काही नसलं तरी चालेल पण दसऱ्यादिवशी ही एक वस्तू खरेदी करणं शुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध केल्याचे म्हटले जाते. म्हणूनच हा दिवस देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देवी दुर्गेची तसेच श्री रामाची पूजा करण्याची प्रथा आहे. शिवाय, दसऱ्याला काही विधी करणे शुभ मानले जाते.
मुंबई : दसरा हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आख्यायिकेनुसार, भगवान श्री रामाने या दिवशी लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. शिवाय, दसऱ्याच्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध केल्याचे म्हटले जाते. म्हणूनच हा दिवस देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देवी दुर्गेची तसेच श्री रामाची पूजा करण्याची प्रथा आहे. शिवाय, दसऱ्याला काही विधी करणे शुभ मानले जाते. या दिवशी काही वस्तू खरेदी केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे या दिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामागील कारण आणि फायदे जाणून घेऊ.
दसऱ्याला झाडू खरेदी करा - धनत्रयोदशी व्यतिरिक्त दसऱ्यादिवशी झाडू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते, कारण हिंदू धर्मात त्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू आपल्या घरातील अशुद्धता, नकारात्मकता आणि गरिबी दूर करतो, ज्यामुळे देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि संपत्ती आणि समृद्धी येते. म्हणून, दसऱ्याला झाडू खरेदी करणे आवश्यक आहे.
advertisement
दसऱ्याला झाडू का खरेदी करावा?
दसऱ्याला खरेदी केलेला झाडू हा दिवाळीच्या स्वच्छतेसाठी वापरता येऊ शकतो. तसेच दसऱ्या दिवशी झाडू खरेदी करणे ही एक नवीन शुभ सुरुवात आहे.
वास्तुशास्त्रानुसार, झाडू घरातील वास्तुदोष दूर करतो. त्यामुळे आर्थिक लाभ देखील होतो आणि आपले भाग्य उजळते. दसऱ्याला घरात झाडू आणल्यानं जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधांमध्ये नवीन संधी निर्माण होतात. घरातून नकारात्मकता दूर होते, ज्यामुळे आनंद आणि शांती येते.
advertisement
दसऱ्यासाठी झाडू-उपाय - दसऱ्यादिवशी सकाळी स्नान करा, स्वच्छ कपडे घालून पूजा करा. त्यानंतर, बाजारातून गवत किंवा बांबूपासून बनवलेला झाडू आणा. अधिक शुभतेसाठी लाल कपड्यात गुंडाळा. एकादशीला त्याचा वापर सुरू करा. घराच्या वायव्य कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dussehra 2025: काही नसलं तरी चालेल पण दसऱ्यादिवशी ही एक वस्तू खरेदी करणं शुभ