Guru Purnima 2025: गुरू पौर्णिमा नेमकी कधी 10 की 11 जुलै? पहा योग्य तिथी, शुभ मुहूर्त-धार्मिक महत्त्व

Last Updated:

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमा ही गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक आहे, जी भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत शिष्य गुरुंच्या आश्रमात राहून ज्ञान प्राप्त करत असत आणि गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करत असत.

News18
News18
मुंबई : आपण जे काही आहोत, त्यामध्ये आपल्या गुरुंचा वाटा मोठा असतो. आयुष्यात आपले एक ना अनेक गुरू असू शकतात. कोणताही व्यक्ती आर्थिक, सामाजिक अथवा करिअरमध्ये मोठा होतो, त्या पाठीमागे तो ज्या समाजात, वातावरणात वाढला त्याचेही त्यात योगदान असतं. यासाठी गुरु पौर्णिमेचा सण हा आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्याचा आहे.
वर्ष २०२५ मध्ये गुरुपौर्णिमा गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात १० जुलै रोजी पहाटे १ वाजून ३६ मिनिटांनी होईल आणि ११ जुलै रोजी पहाटे २ वाजून ०६ मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल.
धार्मिक महत्त्व: गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. या दिवशी गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या सणाला 'व्यास पौर्णिमा' असेही म्हटले जाते, कारण या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी वेदव्यास हे महाभारत, पुराणे आणि वेदांचे रचनाकार मानले जातात, त्यामुळे त्यांना भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जाते.
advertisement
गुरुपौर्णिमेचे प्रमुख धार्मिक महत्त्व खालीलप्रमाणे - भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या समान मानले जाते. 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।' या श्लोकातून गुरुचे महत्त्व अधोरेखित होते. गुरु शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.
advertisement
कृतज्ञता व्यक्त करणे: हा दिवस शिष्यांनी आपल्या गुरुंप्रती आदर, निष्ठा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. गुरुंनी दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले जातात. असे मानले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत हजारो पटीने अधिक कार्यरत असते. त्यामुळे या दिवशी केलेली गुरुसेवा आणि साधना अधिक फलदायी ठरते. या दिवशी महर्षी वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते, कारण ते गुरुपरंपरेतील सर्वश्रेष्ठ गुरु मानले जातात. सर्व ज्ञानाचा उगम त्यांच्यापासून होतो अशी श्रद्धा आहे.
advertisement
गुरु-शिष्य परंपरा: गुरुपौर्णिमा ही गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक आहे, जी भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत शिष्य गुरुंच्या आश्रमात राहून ज्ञान प्राप्त करत असत आणि गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करत असत. या दिवशी गुरुंचे आशीर्वाद घेतल्याने आध्यात्मिक प्रगती होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. या दिवशी गुरुंचे पूजन करून, त्यांना वस्त्र, फुले, फळे आणि दक्षिणा अर्पण करून आशीर्वाद घेतले जातात. ज्यांचे प्रत्यक्ष गुरु नाहीत, ते ईश्वराला किंवा आपल्या माता-पित्यांना गुरु मानून त्यांची पूजा करतात.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Guru Purnima 2025: गुरू पौर्णिमा नेमकी कधी 10 की 11 जुलै? पहा योग्य तिथी, शुभ मुहूर्त-धार्मिक महत्त्व
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement