Shiv Mandir: आशिया खंडातील सर्वात ऊंच शिवमंदिर! येथे दगडांमधून येतो डमरूचा आवाज, शिवलिंग खास

Last Updated:

Jatoli Shiv Mandir: देशातील अनेक प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत, प्रत्येक मंदिराचे वेगळे रहस्य आहे. भारतात देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशात अतिशय रहस्यमय शिव मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या

News18
News18
मुंबई : श्रावण महिना सुरू होण्यासाठी आता काही दिवस उरले आहेत. श्रावणामध्ये महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. आज आपण देशातील प्रसिद्ध शिव मंदिरांबद्दल माहिती जाणून घेऊ. देशातील अनेक प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत, प्रत्येक मंदिराचे वेगळे रहस्य आहे. भारतात देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशात अतिशय रहस्यमय शिव मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या दगडांमधून डमरूचा आवाज येतो.
आशियातील सर्वात उंच शिव मंदिर -  हिमाचलच्या सोलन जिल्ह्यात असलेले शिव मंदिर बांधण्यासाठी 39 वर्षे लागली. या शिव मंदिराची विविध रहस्य कथा सांगिकतल्या जातात. विशेष म्हणजे या शिव मंदिराला आशियातील सर्वात उंच शिव मंदिर म्हटले जाते. जटोली शिव मंदिर या नावानं हे मंदिर प्रसिद्ध आहे.
मंदिराच्या दगडांमधून डमरूचा आवाज - या शिवमंदिरातील भिंतीच्या दगडांवर हातानं जोरात थाप मारल्यास त्यातून डमरूचा आवाज येतो. स्वामी कृष्णानंद परमहंस यांनी हे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. १९५० मध्ये त्यांनी सोलनच्या या दुर्गम टेकड्यांवर शिवमंदिर बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर सुमारे ३९ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, परंतु त्याच्या फक्त ६ वर्षांपूर्वी १९८३ मध्ये स्वामीजींचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी स्वामीजींच्या अपूर्ण स्वप्नांना आकार दिला आणि या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.
advertisement
हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधलं गेलं आहे, उंच शिखरावर एक सोन्याचा कलश आहे. हे १११ फूट उंच मंदिर सोलनमधील पर्वताच्या दुर्गम आणि सर्वात उंच शिखरावर उभं आहे, ते आशियातील सर्वात उंच मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधले गेले आहे, ते उत्तर आणि दक्षिणेचे एकीकरण दर्शवते. शिखरावरील सोन्याचा कलश आहे, या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतो.
advertisement
भव्य शिवलिंग स्फटिकापासून बनलेले - या मंदिराच्या आत महादेवाचे भव्य आणि विशाल शिवलिंग असून ते स्फटिक रत्नापासून बनलेले आहे. स्वामी कृष्णानंद यांची समाधी देखील त्याच्या शेजारी आहे. ज्या ठिकाणी हे मंदिर बांधले आहे त्या ठिकाणाबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते की, साक्षात शंकर येथे आले होते आणि त्यांनी काही काळ येथे वास्तव्य केलं होतं. या मंदिरातील प्राचीन शिवलिंग देखील बराच काळ स्थापित आहे.
advertisement
या मंदिराला महादेवाच्या जटांवरून जटोली हे नाव पडलं आहे - असं मानलं जातं की हे मंदिर पूर्वी भगवान महादेवाचे विश्रांतीस्थान होते. महादेवाच्या लांब जटांमुळे जटोली शिवमंदिर असे नाव पडले आहे. इतक्या उंच टेकडीवर मंदिर असूनही ईशान्य कोपऱ्यात 'जल कुंड' आहे, त्यातील पाणी गंगे इतकेच पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की या तलावाच्या पाण्यात काही औषधी गुणधर्म आहेत जे त्वचारोग बरे करू शकतात.
advertisement
या पाण्याच्या तळ्याबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा स्वामी कृष्णानंद परमहंस येथे आले तेव्हा त्यांनी पाहिले की सोलनमधील लोक पाण्यासाठी वणवण करत आहेत. त्यावेळी त्यांनी महादेवाची कठोर तपस्या केली आणि त्यानंतर या पाण्याच्या तळ्याची उत्पत्ती येथे झाली. तेव्हापासून या भागात कधीही पाण्याची कमतरता भासलेली नाही. जटोली शिवमंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही ते त्वरित पर्यटकांसाठी उघडण्यात आले नव्हते, त्यानंतर २०१३ मध्ये ते शिवभक्तांसाठी उघडण्यात आले.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shiv Mandir: आशिया खंडातील सर्वात ऊंच शिवमंदिर! येथे दगडांमधून येतो डमरूचा आवाज, शिवलिंग खास
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement