Ekadashi 2025: तुळशीची 8 चमत्कारीक नावे! कार्तिकी एकादशीला नामजप करण्याचा इतका फायदा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Puja Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीला माता लक्ष्मीची विशेष कृपा हवी असेल, तर या दिवशी तुळशीच्या ८ नावांचा जप आणि तुळशी मंत्राचा जप नक्की करावा. तुळशीच्या रोपात माता लक्ष्मीचा वास असतो, तुळशी देवी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे.
मुंबई : हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला खूप महत्त्व आहे, तिला प्रबोधिनी एकादशी म्हणूनही ओळखलं जातं. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला पाळल्या जाणाऱ्या देवउठनी एकादशी व्रताचे महत्त्व अधिक वाढतं, कारण या दिवशी चातुर्मासानंतर भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा जगाचे पालन करण्याचे कार्य स्वतःच्या हाती घेतात. देवोत्थानच्या दिवसापासूनच सर्व शुभ आणि मांगलिक कार्ये पुन्हा सुरू होतात.
माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा कशी मिळवावी - देवउठनी एकादशीला भगवान विष्णूचा आशीर्वाद तर घेतला जातोच, पण ही तिथी माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठीही विशेष आहे. एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधीनुसार पूजा केल्यानं जीवनातील सर्व दुःख आणि पापांचा नाश होतो.
advertisement
तुम्हाला कार्तिकी एकादशीला माता लक्ष्मीची विशेष कृपा हवी असेल, तर या दिवशी तुळशीच्या ८ नावांचा जप आणि तुळशी मंत्राचा जप नक्की करावा. तुळशीच्या रोपात माता लक्ष्मीचा वास असतो, तुळशी देवी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. अशा प्रकारे, तुळशीला प्रसन्न करून लक्ष्मीला प्रसन्न करता येतं. घरी विराजमान असलेल्या माता तुळशीच्या ८ नावांच्या मंत्राचा जप केल्यास किंवा थेट ८ नावे घेतल्यास, तुम्ही माता तुळस, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना एकाच वेळी प्रसन्न करून दुःख आणि धनाशी संबंधित अडचणींवर मात करू शकता.
advertisement
तुळशी मंत्राचा जप
वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नन्दनीच तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्रोतं नामर्थं संयुक्तम।
य: पठेत तां च सम्पूज् सौऽश्रमेघ फललंमेता।।
तुळशीच्या आठ नावांचा करा जप
पुष्पसारा, नन्दिनी, वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, तुलसी आणि कृष्ण जीवनी।
तुळशीच्या पूजेत या सामग्रीचा करा वापर -
तुळशीच्या पूजेसाठी पूजा ताटात तुपाचा दिवा, धूप ठेवा. सिंदूर, चंदन, नैवेद्य ठेवा आणि अर्पण करण्यासाठी फुले वाहा. दररोज माता तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मकता टिकून राहते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 2:12 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ekadashi 2025: तुळशीची 8 चमत्कारीक नावे! कार्तिकी एकादशीला नामजप करण्याचा इतका फायदा


