Numerology: या तारखांना जन्मलेल्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथ संकटातून मार्ग दाखवतात

Last Updated:

Shravan Numerology: प्रत्येक मूलांक एका विशिष्ट देवतेशी संबंधित आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, काही विशेष मूलांकावर शंभू-महादेवाची असीम कृपा राहते. महादेवाच्या कृपेने या लोकांचे जीवन आनंदी बनते. सविस्तर जाणून घेऊ.

News18
News18
मुंबई : अंकशास्त्रानुसार, व्यक्तीचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि त्याचे भविष्य मूलांकाद्वारे जाणून घेता येते. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचा मूलांक त्याच्या जन्मतारखेच्या आधारे निश्चित केला जातो. यामध्ये १ ते ९ पर्यंतच्या एकूण मूलांकांचा उल्लेख केला आहे. या मूलांक संख्या नऊ ग्रहांशी संबंधित आहेत आणि प्रत्येक मूलांक एका विशिष्ट देवतेशी संबंधित आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, यामध्ये काही विशेष मूलांक आहेत, ज्यावर शंभू-महादेवाची असीम कृपा राहते. महादेवाच्या कृपेने या लोकांचे जीवन आनंदी बनते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कोणत्या मूलांकावर भोलेनाथाचा विशेष कृपा राहते.
मूलांक ७ - अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक ७ असतो. आपला मूलांक ७ असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण मूलांक ७ असलेल्या लोकांना भगवान शंकराचे विशेष आशीर्वाद मिळतात. हे लोक स्वभावाने शांत, गंभीर आणि आत्मपरीक्षणात रस असलेले असतात. ते स्वाभाविकपणे शंकराच्या भक्तीकडे झुकलेले असतात. भोलेनाथाची पूजा करून त्यांना मानसिक शांती मिळते. शंकराच्या कृपेने त्यांना कधीही मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. शंकराचे विशेष आशीर्वाद त्यांच्यावर राहतात, ज्यामुळे ते जीवनातील अडचणी सहजपणे पार करतात.
advertisement
मूलांक ५ - अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. मूलांक ५ असलेले लोक त्यांच्या तीक्ष्ण बुद्धी, आकर्षक व्यक्तिमत्व आणि सोशल असण्यासाठी ओळखले जातात. भगवान शिवाच्या कृपेने त्यांना करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात नेहमीच यश मिळते. मूलांक ५ असलेले लोक त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात, कष्टानं आयुष्यात यश गाठतात. महादेवाचा विशेष आशीर्वाद त्यांच्यावर राहतो.
advertisement
मूलांक ९ - अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक ९ असतो. मूलांक ९ असलेले लोक खूप निर्भय आणि आत्मविश्वासू असतात. महादेवाबद्द्ल त्यांना खूप आदर असतो. या मूलांकाचे लोक खऱ्या भक्तीनं भोलेनाथाची पूजा करतात तेव्हा त्यांना जीवनात विशेष यश आणि आदर मिळतो. हे लोक सर्वात कठीण परिस्थितीतही धैर्याने लढतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: या तारखांना जन्मलेल्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा; भोलेनाथ संकटातून मार्ग दाखवतात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement