November Astro: नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्यांमध्ये इतक्या गोष्टी खास असतात; त्यांचं दिसणं आणि असणं यात...

Last Updated:

November Birthday: अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांवर मंगळ आणि गुरू ग्रहाचा संयुक्त प्रभाव असतो. या दोन मजबूत ग्रहांचे मिश्रण त्यांना एनर्जेटिक, आत्मविश्वासी आणि करिष्माई बनवते. त्यांची रास साधारणपणे वृश्चिक (Scorpio) किंवा...

News18
News18
मुंबई : काही लोकांचे व्यक्तिमत्त्व खूपच आकर्षक असतं. हजारो लोकांच्या गर्दीत असले, तरी ते लोकांना आपल्याकडे खेचून घेतात.  तुम्ही पाहिलं असेल की काही लोक खूप लवकर दुसऱ्यांना आपलंसं करून घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार, हे त्यांच्या ग्रह-नक्षत्रांचे वैशिष्ट्य असते. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगळे असते. या लोकांना रहस्यमय व्यक्तिमत्त्वाचे मानले जाते.
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात भावनांची खोली असते, आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाची झलक देखील दिसून येते. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींवर मंगळ आणि गुरू ग्रहांचा विशेष प्रभाव राहतो, जो त्यांना ऊर्जावान, करिष्माई आणि भावनात्मकदृष्ट्या गंभीर बनवतो. जाणून घेऊया, नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते.
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांवर ग्रहांचा प्रभाव -
अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांवर मंगळ आणि गुरू ग्रहाचा संयुक्त प्रभाव असतो. या दोन मजबूत ग्रहांचे मिश्रण त्यांना एनर्जेटिक, आत्मविश्वासी आणि करिष्माई बनवते. त्यांची रास साधारणपणे वृश्चिक (Scorpio) किंवा धनु (Sagittarius) असते. या दोन्ही राशींचा स्वभावच त्यांना रहस्यमय आणि खोलवर विचार करणारा बनवतो. प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखण्याची क्षमता त्यांच्यात असते, जीवनाबद्दल त्यांचा दृष्टिकोन खूप स्पष्ट असतो.
advertisement
मनाने कोमल, पण भावनांमध्ये प्रबळ -
नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक मनाने खूप कोमल असतात. ते इतरांच्या भावनांना खोलवर समजून घेतात. अतिराग, आनंद किंवा दुःखाच्या वेळी ते आवेगात निर्णय घेतात. त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे जेणेकरून परिस्थितीमध्ये संतुलन राहील.
शब्दांचे पक्के आणि विश्वासार्ह साथीदार - नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांसोबत तुमचे खूप खास नाते असेल, तर त्यांना कधीही स्वतःपासून दूर जाऊ देऊ नका. कारण हे लोक आपल्या शब्दांबद्दल खूप गंभीर असतात. ते कधीही आपला शब्द मोडत नाहीत. त्याचबरोबर जर कोणी त्यांच्याशी केलेला वायदा मोडला, तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सत्य आणि निष्ठेची झलक असते. उदाहरणार्थ, ते कोणाला भेटण्याचे किंवा एखादे काम करण्याचे वचन देतात, तर ते पाळणे त्यांच्यासाठी सन्मानाचा प्रश्न असतो. याच कारणामुळे लोक त्यांना विश्वासार्ह साथीदार मानतात.
advertisement
पैसे कमावणे आणि व्यवस्थापन करण्यात माहीर -
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांना आर्थिक व्यवस्थापनात (Financial Management) प्राविण्य प्राप्त असते. त्यांच्यात पैसे कमावण्याची आणि योग्य गुंतवणूक करण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यांची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ असते, ज्यामुळे ते येणारे संकट किंवा संधी वेळेत ओळखतात. कुटुंब आणि जवळच्या लोकांप्रति असलेली त्यांची जबाबदारीची भावना त्यांना इतरांपेक्षा निराळी बनवते.
advertisement
आकर्षक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व -
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक असण्यासोबतच रहस्यमय असते. ते आपल्या बोलण्याने, हसण्याने आणि वागण्याने लोकांना सहजपणे प्रभावित करतात. चांगले श्रोता असल्यामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या गोष्टी मनमोकळेपणाने सांगतात. तसेच, त्यांच्यात दुसऱ्यांना योग्य सल्ला देण्याची एक खास क्षमता असते. याच कारणामुळे त्यांचे मत लोकांच्या दृष्टीने योग्य ठरते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
November Astro: नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्यांमध्ये इतक्या गोष्टी खास असतात; त्यांचं दिसणं आणि असणं यात...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement