Astrology: कॅन्सरसारख्या घातक आजारांना कुंडलीतील अशी स्थिती कारण? छोटे उपाय मोठ्या कामाचे
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Rahu Astrology: राहुच्या महादशेदरम्यान तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. राहुच्या महादशेमध्ये तुम्ही कोणत्या आजारांपासून सावध राहिलं पाहिजे आणि या काळात कोणते उपाय करावे लागतात, याविषयी जाणून घेऊया.
मुंबई : राहुला ज्योतिषशास्त्रामध्ये क्रूर ग्रह मानलं गेलं आहे. जेव्हा हा ग्रह कुंडलीत प्रतिकूल अवस्थेत असतो किंवा जेव्हा राहुची महादशा सुरू असते, तेव्हा व्यक्तीला जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मुख्यत्वे राहु तुम्हाला मानसिक त्रास देतो. तसेच, हा तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम करतो. याशिवाय, राहुच्या महादशेदरम्यान तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. राहुच्या महादशेमध्ये तुम्ही कोणत्या आजारांपासून सावध राहिलं पाहिजे आणि या काळात कोणते उपाय करावे लागतात, याविषयी जाणून घेऊया.
राहुच्या महादशेत होणारे आजार -
राहुच्या महादशेदरम्यान नैराश्य येऊ शकते. तुम्हाला विनाकारण चिंता सतावू शकतात, ज्यामुळे सतत तणाव वाढतो. राहुच्या महादशेत तुम्हाला अशक्तपणा (अनिद्रा) चा त्रास होऊ शकतो. तसेच, तुम्हाला वाईट स्वप्नं येतात आणि भय सतावू शकते. राहुच्या महादशेदरम्यान मनोरोग होण्याची शक्यता वाढते. काही लोक वेडे देखील होऊ शकतात. राहुच्या महादशेमध्ये भ्रम किंवा गोंधळाची स्थिती कायम राहते, ज्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता.
advertisement
राहुच्या महादशेदरम्यान तुम्हाला डोकेदुखी सोबतच हाडांमध्ये वेदना होण्याची समस्या देखील होऊ शकते. क्रूर ग्रह राहुच्या महादशेमुळे एखाद्याला कर्करोग (कॅन्सर) होऊ शकतो. त्वचेचे रोग होण्याचे कारणही राहुची महादशा असू शकते. केस गळणे आणि नखांशी संबंधित आरोग्याच्या समस्यांनाही तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते. गॅस आणि मूळव्याध (बवासीर) यांसारखे रोग देखील राहुच्या महादशेदरम्यान होतात.
advertisement
राहुच्या महादशेतील आजारांपासून वाचवण्यासाठी उपाय
राहुच्या महादशेदरम्यान तुम्ही काही उपाय केल्यास वाईट प्रभावांतून सुटका मिळू शकते. राहुच्या महादशेदरम्यान तुम्ही शारीरिकरित्या अॅक्टिव राहिले पाहिजे आणि योग्य दिनचर्येचे पालन केले पाहिजे.
सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपण्याच्या सवयीमुळे राहुच्या वाईट प्रभावापासून तुमचे रक्षण होते आणि तुम्ही निरोगी राहाल. राहुच्या महादशेदरम्यान भगवान शिवाची पूजा सतत करावी. असे केल्याने राहुचे वाईट परिणाम दूर होऊ लागतात. या काळात भैरव मंदिरात जाण्याने देखील तुम्हाला शुभ फळे मिळतात. राहुच्या महादशेमध्ये राहुच्या बीज मंत्राचा "ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः" जप करावा. असे केल्यानेही तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचा अंत होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology: कॅन्सरसारख्या घातक आजारांना कुंडलीतील अशी स्थिती कारण? छोटे उपाय मोठ्या कामाचे