Diwali 2025: पैसा-संपत्तीचा स्वामी..! पण कुबेर देवाची मूर्ती घरातील देव्हाऱ्यात ठेवणं शुभ की अशुभ?

Last Updated:

Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार, कुबेराची मूर्ती घरात ठेवणं तेव्हाच शुभ फळ देणारं ठरतं, जेव्हा तिची दिशा, शुद्धता आणि उद्देश योग्य असतात. जर या गोष्टींची नीट काळजी घेतली नाही, तर या मूर्तीचे फायदे कमी आणि तोटे जास्त दिसू लागतात.

News18
News18
मुंबई : शास्त्रामध्ये कुबेरदेवाला धन, भांडार आणि उत्तर दिशेचा स्वामी म्हणून वर्णन केलं आहे. पण कुबेराची मूर्ती घरात ठेवायची की नाही, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार, कुबेराची मूर्ती घरात ठेवणं तेव्हाच शुभ फळ देणारं ठरतं, जेव्हा तिची दिशा, शुद्धता आणि उद्देश योग्य असतात. जर या गोष्टींची नीट काळजी घेतली नाही, तर या मूर्तीचे फायदे कमी आणि तोटे जास्त दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हाला घरात कुबेराची मूर्ती ठेवायची असेल, तर तुम्ही नक्की ठेवू शकता, पण या मूर्तीशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
कोठे मूर्ती ठेवणं फायद्याचं - घरात कुबेराची मूर्ती कुठे ठेवायची, हे खूप महत्त्वाचं आहे. कुबेर देवाची मूर्ती घराच्या मुख्य दरवाजाजवळ, म्हणजे मेन गेटवर ठेवणं सर्वात चांगलं मानलं गेलं आहे. यामुळे घरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ती मूर्ती दिसणार. जर तुम्ही ती अशा प्रकारे ठेवली, तर घरात सकारात्मक ऊर्जा येणार. मूर्तीला अशा ठिकाणी ठेवायचं, जिथून ती दिसेल आणि अंधाऱ्या जागी ठेवायची नाही. कुबेर देवाची मूर्ती जमिनीवर ठेवणं चुकीचं मानलं जातं.
advertisement
या दिशेला ठेवा कुबेर देव - कुबेर देवाची मूर्ती घर किंवा पूजा घरात उत्तर दिशेला ठेवा. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. त्यांचं तोंड दक्षिण दिशेकडे असावं (म्हणजे ते दक्षिणेकडे बघून बसलेले असावेत). यामुळे धनाची आवक उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे (म्हणजे घराच्या आत) होते, असं मानलं जातं. उत्तर दिशेत शुभ ग्रह (जसे बुध किंवा बृहस्पती) असल्यास धनवृद्धी होते. मूर्तीला लक्ष्मी-गणेशासोबत न ठेवता थोडं वेगळं ठेवा, कारण कुबेर हे राजकोषाध्यक्ष आहेत. ते देवता नसून यक्षराज आहेत.
advertisement
या ठिकाणी मूर्ती ठेवू नका - वास्तू तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कुबेर देवाची मूर्ती टीव्ही आणि फ्रीजसारख्या वस्तूंवर सजावटीसाठी म्हणून ठेवणं योग्य मानलं जातं नाही. अनेक लोक कुबेर देवाची मूर्ती केवळ सजावटीसाठी ठेवतात, ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचबरोबर जिथे मूर्ती ठेवली आहे, तिथे चुकूनही चपला-जोडे किंवा घाण वस्तू ठेवू नका. अशा ठिकाणी ठेवल्यामुळे तिची शक्ती कमी होते आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे कुबेर देवाची मूर्ती ठेवण्यासाठी निवडलेली जागा, तिची उंची, दिशा, आजूबाजूची स्वच्छता आणि ती दिसायला सोपी आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे.
advertisement
पूजेमुळे सुख-सौभाग्य वाढतं - वास्तुशास्त्रानुसार, हसणाऱ्या बुद्धासोबत भगवान कुबेरांची मूर्ती कुटुंबात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. तिला रोज बघितल्याने आणि तिची पूजा केल्याने घरात सुख-सौभाग्य आणि धन वाढतं. मूर्तीला स्वच्छ जागेवर ठेवणं आणि तिच्या आजूबाजूला फुलं किंवा दिवा लावणं चांगलं मानलं जातं.
धनत्रयोदशी व्यतिरिक्त या 7 प्रसंगी घरासाठी झाडू खरेदी करणं शुभफळदायी
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Diwali 2025: पैसा-संपत्तीचा स्वामी..! पण कुबेर देवाची मूर्ती घरातील देव्हाऱ्यात ठेवणं शुभ की अशुभ?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement