Gemstones: अनेक मार्गांनी येतो पैसा, इनकम सुपर बूस्ट करणारी 4 रत्ने; धारण करणारे श्रीमंती पाहतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gemstones: अनेकदा काही लोक वारंवार आपल्या करिअरमध्ये अपयश पाहतात. व्यवसाय असो वा नोकरी, जर तुम्हालाही निराशा येत असेल, तर अशा कठीण काळात ज्योतिष्यांकडून काही रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.
मुंबई : प्रयत्न खूप करूनही वाईट दिवस येत असतील तर व्यक्ती निराश होते. पण निराश होऊन भागत नाही, काहीतरी उपाय काढावाच लागतो. मनात आशा ठेवावी लागते. अनेकदा काही लोक वारंवार आपल्या करिअरमध्ये अपयश पाहतात. व्यवसाय असो वा नोकरी, जर तुम्हालाही निराशा येत असेल, तर अशा कठीण काळात ज्योतिष्यांकडून काही रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.
रत्नशास्त्रामध्ये रत्नांना ग्रहांच्या ऊर्जेशी जोडले जाते. योग्य रत्न परिधान केल्यास, जीवनात करिअर, धन, आत्मविश्वास आणि यशामध्ये जबरदस्त वाढ होते, असे मानले जाते. विशेषतः काही रत्न अशी आहेत, जी धारण करताच आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि नवीन संधी मिळू लागतात. या रत्नांची शक्ती व्यक्तीच्या प्रयत्नांना दिशा देते आणि भाग्य जागृत करते.
advertisement
प्रगतीसाठी धारण करा ही 4 शक्तिशाली रत्ने -
1. टायगर रत्न (Tiger Eye): टायगर रत्न पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या पट्ट्यांसारखा दिसतो. त्यानं आर्थिक अडचणी कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो. नोकरी किंवा व्यवसायात अचानक लाभ हवा असल्यास, हे रत्न अत्यंत शुभ मानले जाते. हे उजव्या हाताच्या मधल्या बोटात (मध्यमा) परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
2. पुष्कराज (Pukhraj): पिवळ्या रंगाचा चमकदार पुष्कराज हे गुरु ग्रहाचे प्रभावशाली रत्न आहे. तो धारण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि करिअरमध्ये प्रगती मिळते. हे रत्न तर्जनी (पहिले बोट) मध्ये परिधान करणे शुभ मानले जाते. दीर्घकाळ परिधान केल्यास पुष्कराज कायमस्वरूपी लाभ देतो आणि ज्ञान व नशिबाची साथ देतो.
advertisement
3. ग्रीन जेड (Green Jade): ग्रीन जेडला समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हे रत्न परिधान केल्याने मानसिक संतुलन राखले जाते, कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. हे रत्न मान-सन्मान वाढवण्यासोबतच व्यवसाय आणि करिअरमध्ये नवीन उंचीवर पोहोचण्यास मदत होते. जीवनात संतुलन आणि प्रगती इच्छिणाऱ्यांसाठी हे अत्यंत लाभदायक आहे.
advertisement
4. नीलम (Neelam): नीलम हे शनी ग्रहाचे रत्न आहे, त्याची ऊर्जा अत्यंत तीव्र मानली जाते. हे रत्न परिधान केल्याने शनीचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि जीवनात सकारात्मक बदल येतात. रत्नशास्त्रानुसार, नीलम धैर्य, समजूतदारपणा आणि दीर्घकालीन आर्थिक लाभासाठी परिधान केले जाते. पण, हे रत्न सर्वांना अनुकूल नसते, त्यामुळे ते परिधान करण्यापूर्वी रास कुंडलीची तपासणी करणे आवश्यक आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 4:00 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Gemstones: अनेक मार्गांनी येतो पैसा, इनकम सुपर बूस्ट करणारी 4 रत्ने; धारण करणारे श्रीमंती पाहतात


