Vastu Tips: घराच्या या दोन दिशांना कार पार्किंग करणे अतिशय शुभ, जागा बदलून परिणाम पहाल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu For Parking : वास्तुशास्त्रानुसार घरासमोरची जागा योग्य ठरतेच असं नाही. घराच्या कोणत्या दिशेला वाहन पार्क केलं आहे, त्याचा परिणाम घराच्या उर्जेवर, संपत्तीवर, प्रगतीवर आणि शांतीवरही होतो. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
मुंबई : घर बांधताना आता कार पार्किंगचा विचार करावाच लागतो. ऊन, वारा, पावसामध्ये कार सुरक्षित राहण्यासाठी चांगली व्यवस्था करणे गरजेचे असते. तुम्ही दररोज ज्या ठिकाणी वाहन पार्क करता ती जागा तुमच्या जीवनावर परिणाम करू शकते? बहुतेक लोक घरासमोर वाहन पार्क करतात, ते सर्वांनाच सोयीस्कर वाटतं. परंतु, वास्तुशास्त्रानुसार घरासमोरची जागा योग्य ठरतेच असं नाही. घराच्या कोणत्या दिशेला वाहन पार्क केलं आहे, त्याचा परिणाम घराच्या उर्जेवर, संपत्तीवर, प्रगतीवर आणि शांतीवरही होतो. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या समोरील जागा फक्त येण्या-जाण्याचा मार्ग नसून तिथून सकारात्मक ऊर्जा घरात येत असते. वाहन दरवाजासमोर पार्क केले असेल तर ही ऊर्जा घरात योग्यरित्या प्रवेश करत नाही. यामुळे जीवनात अडचणी, पैशाची चणचण आणि कौटुंबिक तणाव यासारख्या गोष्टी वाढू शकतात.
वाहन मुख्य दरवाज्याजवळ दररोज पार्क केलं जात असेल तर घराच्या वातावरणावरही परिणाम करू शकते. तसेच, घरासमोर वाहन पार्क केल्यानं रस्ता अरुंद होऊ शकतो, ज्यामुळे ये-जा करण्यासही त्रास होतोच, शिवाय मनात असंतुलन निर्माण होते.
advertisement
फक्त समोर पार्किंगचा पर्याय असेल तर काय करावं?
- वाहन मुख्य दरवाज्यापासून थोडे दूर ठेवा.
- पार्किंगची जागा नेहमी स्वच्छ ठेवा.
- वाहन झाकून ठेवा आणि वेळोवेळी ते स्वच्छ करत रहा.
- वाहनाचा पुढचा भाग घराच्या दिशेकडे तोंड करून नसावा.
advertisement
वाहन घराच्या मागे किंवा बाजूला पार्क करणे चांगले का आहे?
घराचा मागचा भाग स्थिरता आणि सुरक्षिततेशी संबंधित मानला जातो. तुम्ही वाहन मागे किंवा बाजूला पार्क केले तर उर्जेचा प्रवाह घराच्या मुख्य दरवाज्यावर राहतो. यामुळे घरात आनंद, शांती आणि समृद्धी राहते, असे मानले जाते.
वाहन मागे पार्क केल्याने, त्याच्याशी संबंधित नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. असेही मानले जाते की, अशा व्यवस्थेमुळे घरात राहणारे लोक शांत राहतात आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता चांगली होऊ लागते.
advertisement
पार्किंगसाठी कोणती दिशा सर्वोत्तम आहे?
वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था करताना घराच्या वायव्य किंवा आग्नेय दिशेचा वापर करावा. घराच्या या दोन दिशांना कार पार्किंग करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिशा वेग आणि उर्जेशी संबंधित आहेत, त्या वाहनांसाठी शुभ मानल्या जातात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 15, 2025 2:07 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घराच्या या दोन दिशांना कार पार्किंग करणे अतिशय शुभ, जागा बदलून परिणाम पहाल