Religious: कोण आहेत हे बाबा? 100 व्या जन्‍मदिन कार्यक्रमाला PM मोदी येणार, 150 हून अधिक देशांत भक्‍त

Last Updated:

Religious: आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हा उत्सव 10 दिवस चालणार आहे. भारत हा धार्मिक आणि आध्यात्मिक गुरूंचा देशही मानला जातो, यासाठी जगभरात भारताची एक वेगळी ओळख आहे.

News18
News18
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे एक भव्य कार्यक्रम आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हे देखील सहभागी होतील. आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हा उत्सव 10 दिवस चालणार आहे. भारत हा धार्मिक आणि आध्यात्मिक गुरूंचा देशही मानला जातो, यासाठी जगभरात भारताची एक वेगळी ओळख आहे. भारतीय गुरूंचे शिष्य जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी आढळून येतात. आज आपण अशाच एका आध्यात्मिक गुरूबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे शिष्य 150 हून अधिक देशांमध्ये आहेत.
सचिन तेंडुलकर भक्तांपैकी एक -
ज्यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, त्यांचे नाव आहे श्री सत्यसाई बाबा. ज्यांचे भक्त आजही जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून राजकारणी आणि सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. 23 नोव्हेंबर 1926 रोजी आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे जन्मलेल्या सत्य साई बाबांचे जीवन चमत्कारांनी भरलेलं होतं. ते स्वतः चमत्कार करण्यासाठी प्रसिद्ध होते.
advertisement
100 वी जयंती - यावर्षी सत्य साई बाबांचा 100 वा जयंती सोहळा पुट्टपर्ती येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. श्री सत्यसाई बाबांचा जन्मशताब्दी सोहळा 13 ते 24 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे, त्यामध्ये सुमारे 140 देशांमधील भाविक भक्त सहभागी होण्याची अपेक्षा आहे. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभागी होतील. या प्रसंगी 100 रुपयांचे स्मारक नाणे प्रसिद्ध केले जाणार आहे आणि इतर अनेक कार्यक्रमही आयोजित केले आहेत.
advertisement
शिर्डी साई बाबांचा अवतार - सत्य साई बाबांना त्यांचे भक्त शिर्डी साई बाबांचा अवतार मानतात. वयाच्या 14 व्या वर्षी सत्य साई बाबांनी स्वतःला शिवशक्तीचे अवतार शिर्डी साईंचा अवतार असल्याचे घोषित केले.
मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत - सत्य साई बाबांचे जीवन खूपच रंजक आणि चमत्कारीक होते. ते हायस्कूलमध्ये असताना त्यांना विंचू चावल्यानं ते कोमात गेले. ते कोमातून बाहेर आले तेव्हा त्यांचे वर्तन विचित्र झाले. त्यांनी खाणे-पिणे बंद केले, ते सतत श्लोक म्हणायचे आणि मंत्र जप करायचे.
advertisement
समाजसेवेत आग्रही - सर्व धर्माचे लोक आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबांचे शिष्य होते. सत्य साई बाबा व्यापक सामाजिक कार्यात होते, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि आश्रम चालवत होते. त्यांचे साम्राज्य देश आणि परदेशात पसरलेले आहे.
त्यांच्या महासमाधीनंतरचा सर्वात मोठा कार्यक्रम - सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दीचा हा उत्सव 2011 मध्ये त्यांच्या महासमाधीनंतरचा सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच, त्यांचे भक्त या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Religious: कोण आहेत हे बाबा? 100 व्या जन्‍मदिन कार्यक्रमाला PM मोदी येणार, 150 हून अधिक देशांत भक्‍त
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement