वटपौर्णिमेला एक लाखात बायकोला गिफ्ट करा नवी मारुती सुझुकी स्विफ्ट
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
विशेष म्हणजे नवीन स्विफ्ट तिच्या अद्ययावत फीचर्समुळे ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. त्यामुळे तिच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे.
मुंबई : गेल्या महिन्यात भारतातील विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत मारुती सुझुकी स्विफ्ट ही सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली. मारुतीच्याच अनेक टॉप सेलिंग गाड्यांना स्विफ्टने मागे टाकलं. विशेष म्हणजे नवीन स्विफ्ट तिच्या अद्ययावत फीचर्समुळे ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. त्यामुळे तिच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे.
भारतात हजारो लोक कर्ज काढून दर महिन्याला कार खरेदी करतात. तुम्हालाही कार घ्यायची असेल तर स्विफ्टच्या बेस मॉडेल आणि टॉप मॉडेलवर किती कर्ज मिळेल, त्याचा ईएमआय, डाउनपेमेंट आणि इंटरेस्ट रेट किती बसेल याबाबत माहिती देणार आहोत.
नवीन स्विफ्ट विकत घेण्यासाठी असलेले कर्जाचे पर्याय जाणून घेण्याआधी तिची किंमत आणि फीचर्स यांबाबत काही माहिती घेऊया. नवीन स्विफ्टची किंमत 6.49 लाखांपासून सुरु होते. तिच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.64 लाख रुपयांपर्यंत जाते. स्विफ्टमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 82 पीएस पॉवर आणि 112 न्यूटन/मीटर टॉर्क जनरेट करतं. स्विफ्टच्या मॅन्युअल व्हेरिअंटचं मायलेज 24.8 किलोमीटर प्रतिलिटर एवढं आहे तर ऑटोमॅटिक व्हेरिअंटचं मायलेज 25.75 किलोमीटर प्रतिलिटर एवढं मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
advertisement
न्यू मारुती स्विफ्टच्या एलएक्सआय या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत 7.28 लाख रुपये आहे. एक लाख रुपये डाउन पेमेंट करुन तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर 6.28 लाख रुपये कर्ज घ्यावं लागेल. बँकेने या कर्जावर 9.20 टक्के व्याज आकारलं तर 5 वर्षांच्या मुदतीसाठी 13,108 रुपये हप्ता बसेल. म्हणजे 5 वर्षात व्याजापोटी तुम्ही 1.58 लाख रुपये बॅंकेला द्याल. न्यू मारुती स्विफ्ट झेडएक्सआयच्या मॅन्युअल मॉडेलची ऑन-रोड किंमत 9.25 लाख रुपये आहे. एक लाख रुपये डाउन पेमेंट करुन तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर 8.25 लाख रुपये कर्ज घ्यावं लागेल. 9.20 टक्के व्याज दर असेल तर 5 वर्षांच्या मुदतीसाठी 17,206 रुपये हप्ता बसेल. या कारसाठी 5 वर्षांच्या कालावधीत तुम्ही 2.07 लाख रुपये व्याज भराल. नवीन स्विफ्टचं कोणतंही मॉडेल विकत घ्यायचा विचार करत असाल तर जवळच्या मारुती सुझुकी डीलरला भेट देऊन अधिक माहिती घ्या.
advertisement
(वर दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणतीही खरेदी करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. न्यूज18 मराठी या माहितीची खातरजमा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2024 12:45 PM IST