आता महिंद्रा करणार धमाका, आणतेय दमदार अशी SUV, थेट Tata Sierra ला भिडणार!

Last Updated:

टाटा सियाराने मार्केटमध्ये एकच धुमाकूळ घातला आहे. आता महिंद्रा लवकरच म्हणजे पुढील महिन्यात आपली  SUV XUV 7XO लाँच करणार आहे.

News18
News18
अलीकडेच टाटा मोटर्सने आपली सियारा ही लिजेंड एसयूव्ही लाँच केली. टाटा सियाराने मार्केटमध्ये एकच धुमाकूळ घातला आहे. आता महिंद्रा लवकरच म्हणजे पुढील महिन्यात आपली  SUV XUV 7XO लाँच करणार आहे. महिंद्राकडून टीझर सुद्धा रिलीज करण्यात आलाा आहे. यामध्ये नव्या एसयूव्हीची झलक पाहण्यास मिळत आहे.  Mahindra XUV 7XO मध्ये एक मजबूत इंजिन आणि चांगले फिचर्स मिळणार आहे. येत्या ५ जानेवारी २०२६ ला ही Mahindra XUV 7XO लाँच होणार आहे.
महिंद्राकडून नुकताच एक टिझर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेता शाहरूख खानच्या डॉन सिनेमाच्या टायटल ट्रॅकवर हा टिझर रिलीज केला आहे. यामध्ये Mahindra XUV 7XO ची झलक पाहण्यास मिळतेय. यामध्ये  L-शेप LED DRL, प्रोजेक्टर हेडलाईट्स आणि मागे L-शेप LED टेल लाइट्स दिले आहे. त्यामुळे नवीन Mahindra XUV 7XO ही वेगळी असणार आहे, हे स्पष्ट आहे.
advertisement
प्रीमियर फिचर्स
नव्या Mahindra XUV 7XO मध्ये फिचर्सची माहिती अद्याप समोर आला नीही. पण यामध्ये प्रीमियम इंटीरियर, पॅनोरमिक सनरूफ, ADAS सेफ्टी फिचर्स, हरमन ऑडिओ सिस्टम, ट्रिपल स्क्रीन सेटअप  आणि 360-डिग्री कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर  ABS, EBD, ६ एअयरबॅग आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट सारखे सेफ्टी फिचर्सही दिले जातील. हे फिचर्स महिंद्राच्या आधीच्या एसयूव्हीमध्येही पाहण्यास मिळाले.
advertisement
पेट्रोल आणि डिझेलमध्ये २ इंजिन
Mahindra XUV 7XO मध्ये दोन इंजिनचा पर्याय मिळणार आहे. यामध्ये  2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि दुसरं 2.2-लिटर टर्बो डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे. या दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय मिळेल.
advertisement
कधी होणार लाँच? 
Mahindra XUV 7XO ने ही एसयूव्ही लाँच करण्याची तारीखही जाहीर केली आहे, ५ जानेवारी २०२६ मध्ये Mahindra XUV 7XO अधिकृतपणे लाँच होईल. त्या दिवशीच एसयूव्ही किंमतही सांगितली जाईल. लाँच झाल्यानंतर Mahindra XUV 7XO चा सामना हे थेट मिडसाईज एसयूव्ही MG Hector, Tata Sierra, Tata Safari, Hyundai Creta, Honda Elevate आणि Kia Seltos सारख्या एसयूव्हीशी असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
आता महिंद्रा करणार धमाका, आणतेय दमदार अशी SUV, थेट Tata Sierra ला भिडणार!
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement