Maruti सोबत पहिल्यांदाच असं घडलं! 33 किमी मायलेज देणाऱ्या कारकडे लोकांनी फिरवली पाठ!

Last Updated:

पण आता मारुतीला आपल्या दोन छोट्या कारमुळे मोठा धक्का बसला. पहिल्यांदाच मायलेजमध्ये बेस्ट असलेल्या या गाड्यांकडे लोकांनी अक्षरश: पाठ फिरवली आहे. 

News18
News18
मुंबई : भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वाधिक कार उत्पादनाचा किताब आपल्या नावावर कोरला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी सगळ्यात स्वस्त कार तयार करणारी कार कंपनी म्हणून मारुतीची ओळख आहे. पण आता मारुतीला आपल्या दोन छोट्या कारमुळे मोठा धक्का बसला. पहिल्यांदाच मायलेजमध्ये बेस्ट असलेल्या या गाड्यांकडे लोकांनी अक्षरश: पाठ फिरवली आहे.
मारुतीची Alto K10 आणि S-Presso ची आतापर्यंतची सर्वात खराब विक्री झाली आहे. मागील महिन्यात  फक्त 6,332 यूनिट्सची विक्री झाली आहे. तर मागील वर्षी एप्रिल महिन्यातच याच कारची 11,519 यूनिट्स इतकी विक्री झाली होती. पण आता ग्राहकांनी सपशेलपणे या कारकडे पाठ फिरवली आहे. माच्या वर्षाच्या तुलनेत 5187 यूनिट्स कमी कारची विक्री झाली आहे. या दोन्ही गाड्यांची किंमत सध्या जास्त आहे. या दोन्ही कारच्या किंमतीत थोडे पैसे टाकून यापेक्षा दमदार कार सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असल्यामुळे  या गाड्यांची विक्री कमी झाल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
Maruti Alto k10: अल्टो के१० मध्ये १.०-लिटर पेट्रोल इंजिन (६७ एचपी) आहे जे ई२० इंधन आहे. ही कार ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी पर्यायांसह येते. याशिवाय, अल्टो के१० चा फॅक्टरी-फिटेड सीएनजी प्रकार देखील पूर्वीप्रमाणेच उपलब्ध आहे. अलीकडेच केंद्र सरकारने सर्व गाड्यांमध्ये एअर बॅग्स बंधनकारक केल्यामुळे मारुतीने या कारमध्ये ६ एअरबॅग्ज (फ्रंट + साइड + कर्टन एअरबॅग्ज), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीट बेल्ट, मागील पार्किंग सेन्सर्स आणि सामान ठेवण्यासाठी क्रॉसबार असे फिचर्स दिले आहेत.
advertisement
Maruti Suzuki S-Presso : ही सगळ्यात जास्त मायलेज देणारी कार म्हणून पाहिली जाते. या कारमध्ये आता अपडेटेड इंजिन सुद्धा दिलं आहे.  ही हॅचबॅक कार 24.12 किमी/लिटर-25.30 किमी/लिटर मायलेज देते. ही एक आयडल सिटी कार आहे. यात हिल होल्ड असिस्ट फंक्शन, पॅसेंजर साइड एअरबॅगसह ईएसपी आहे.  पेट्रोल मोडमध्ये ही कार 25 किलोमीटर इतक मायलेज देते. तर  CNG वर 33किमी इतकं मायलेज देते.  S-Presso ची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते.
मराठी बातम्या/ऑटो/
Maruti सोबत पहिल्यांदाच असं घडलं! 33 किमी मायलेज देणाऱ्या कारकडे लोकांनी फिरवली पाठ!
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement