Boreal : वारं बदलणार, SUV चं मार्केट गाजवायला ती परत येतेय, हे असेल नाव!
- Published by:sachin Salve
Last Updated:
भारतीय मार्केटमध्ये एकेकाळी दबदबा निर्माण करणारी Renault जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.
मुंबई: भारतात सध्या एकापेक्षा एक एसयुव्ही गाड्यांनी मार्केट व्यापून टाकलं आहे. महिंद्रा, टाटा, मारुती सुझुकी, हुंदईसह इतर कार उत्पादक कंपन्यांनी SUV लाँच करून मार्केटचा चेहराच बदलला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब हे SUV खरेदी करण्याकडे वळाला आहे. आता भारतीय मार्केटमध्ये एकेकाळी दबदबा निर्माण करणारी Renault जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. Renault आपली Duster नव्या नावाने लाँच करणार हे आता निश्चित झालं आहे.
Renault मोटर्सने आपल्या नवीन SUV चं नाव जाहीर केलं आहे. नवी एसयुव्ही ही Boreal नावाने लाँच होणार आहे. कंपनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा एसयूव्हीचं टिझर प्रसिद्ध केलं आहे. या एसयूव्हीबद्दल अजून कोणताही माहिती कंपनीने दिली नाही. पण Renault ची डस्टर आपल्या सेगमेंटमध्ये एकेकाळी सर्वाधिक विक्री झाली एसयूव्ही होती.
Renault Boreal: un SUV tecnológico y confortable
un nombre con muchos significados, que remite directamente a la luz, la tecnología y los grandes espacios
mantente atento para saber más a medida que Renault #Boreal se devele en los próximos meses. pic.twitter.com/KhYMO39ABo
— Renault RD (@RenaultRD) April 28, 2025
advertisement
Renault Boreal कशी असेल?
Renault ने SUV चं नाव तर सांगितलं आहे. Boreal नावाने ही नवीन एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लाँच करणार आहे. ही एसयूव्ही लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीने जारी केलेल्या टिझरमध्ये फक्त या नव्या Renault Boreal चं फक्त नाव दिसत आहे. विशेष म्हणजे, ही Boreal 7 सीटर असणार आहे. याआधी डस्टर ही 5 सीटर होती. अशी माहिती मिळतेय की Renault Boreal ही 5 सीटरचा ऑप्शन सुद्धा दिला जाईल. पण याबद्दल अजून कंपनीने काही माहिती दिली नाही.
advertisement
भारतात कधी होईल लाँच?
Renault Boreal भारतात कधी लाँच होणार याबद्दल कंपनीने कमालीचा सस्पेन्स राखला आहे. पण Renault Boreal ही भारतात २०२६-२७ मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 30, 2025 8:58 PM IST