22 हजार रुपयांत घरी घेऊन या टेस्लाची 60 लाखांची कोरी करकरीत कार!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कंपनीने २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीपासून (Q3 2025) डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली आहे.
भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगात (EV Industry) क्रांती घडवण्यासाठी सज्ज असलेली जगप्रसिद्ध कंपनी टेस्ला (Tesla) आता अखेर अधिकृतपणे भारतात दाखल झाली आहे. मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये टेस्लाने आपले शोरूम उघडले असून, पहिल्या टप्प्यात टेस्लाची लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही 'मॉडेल वाय' (Model Y) भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या कारची किंमत सुमारे ६० ते ७० लाख रुपये (ऑन-रोड) असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, अनेकांना प्रश्न पडला आहे की एवढी महागडी कार बुक करण्यासाठी सुरुवातीला किती डाउन पेमेंट करावे लागणार?
मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला कार बुक करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला फार मोठी रक्कम द्यावी लागणार नाही. टेस्लाची बुकिंग प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असल्यामुळे, संभाव्य खरेदीदारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून बुकिंग करता येईल. मॉडेल वाय बुक करण्यासाठी सुरुवातीची रक्कम सुमारे ₹१ लाख ते ₹२ लाख इतकी असू शकते. ही रक्कम टोकन मनी (Token Money) म्हणून घेतली जाईल, जी नंतर कारच्या एकूण किमतीतून वजा केली जाईल.
advertisement
अंतिम डाउन पेमेंट आणि कर्ज प्रक्रिया
केवळ बुकिंगची रक्कम ही अंतिम डाउन पेमेंट नसते. कारच्या एकूण किमतीपैकी तुम्हाला उर्वरित रक्कम भरावी लागते. सहसा, ऑन-रोड किमतीच्या १० ते १५ टक्के रक्कम डाउन पेमेंट म्हणून भरावी लागते. टेस्लाची कार बुक करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवर जावं लागणार आहे. तिथे तुम्हाला 9 पर्याय दिसतील, तुम्ही यात मुंबई, दिल्ली किंवा गुरुग्रामपैकी पर्याय निवडू शकता. कोणतंही एक शहर निवडल्यानंतर तुम्हाला बुकिंग करायचं आहे. 22 हजार 220 रुपये भरुन तुम्ही बुकिंग करु शकता. त्यानंतर सात दिवसांमध्ये तुम्हाला 3 लाख रुपये भरायचे आहेत. तुम्ही 22 हजार रुपये बुकिंग करुन तुम्ही संपूर्ण रक्कम EMI देखील करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम रिफंडेबल नाही, त्यामुळे सगळ्या टर्म्स वाचूनच तुम्ही कार बुक करा.
advertisement
टेस्लाची भारतात एन्ट्री होण्याआधीपासूनच अनेक वाहनप्रेमी त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्यांची वाट पाहत आहेत. कंपनीने २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीपासून (Q3 2025) डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, आता बुकिंग करणाऱ्यांना पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागू शकते. पण यामुळे, कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि फायनान्सच्या इतर गोष्टींची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
advertisement
टेस्लाची ही कार तिच्या आकर्षक डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान आणि जबरदस्त बॅटरी रेंजसाठी ओळखली जाते. ५०० किलोमीटरहून अधिक रेंज असल्याने ही कार लांबच्या प्रवासासाठीही योग्य आहे. या उच्च-तंत्रज्ञान कारच्या खरेदीसाठी सुरुवातीचे छोटे डाउन पेमेंट ही ग्राहकांसाठी निश्चितच एक चांगली गोष्ट आहे.
मॉडेल 3 ची किंमत अंदाजे 45 ते 55 लाख रुपये दरम्यान आहे. मॉडेल Y ची किंमत सुमारे 65 ते 75 लाख रुपये आहे. मॉडेल Y ही एसयूव्ही असल्यामुळे ती थोडी महाग आहे, कारण ती जास्त मोठी, आरामदायक आणि लांब रेंजची आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2025 2:33 PM IST