Bank Job : सेंट्रल बँकेत 10वी पाससाठी नोकरीची मोठी संधी! बंपर भरती, पगार 28000 पेक्षा जास्त
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
जर तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये नोकरीच्या शोधात असाल, तर 10वी उत्तीर्णांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करावासा वाटत असेल, तर आधी खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
मुंबई, 21 डिसेंबर : जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि बँकेत नोकरी मिळवायची असेल, तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये चांगली संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सब स्टाफ अर्थात सफाई कर्मचारी या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतो. यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी तुम्ही 9 जानेवारी 2024 किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता. या विशेष भरतीअंतर्गत, स्वच्छता कर्मचारी म्हणून उपकर्मचाऱ्यांच्या एकूण 484 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तुम्हालाही या पदांवर नोकरी मिळवायची असेल, तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
सेंट्रल बँकेसाठी अर्ज करणार्या उमेदवारांकडे ही पात्रता आवश्यक
advertisement
ज्या उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता 10 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे.
सेंट्रल बँकेत अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती असेल?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 31 मार्च 2023 पर्यंत 18 ते 26 वर्षे दरम्यान असावी. याशिवाय सरकारी नियमांनुसार वयातही सवलत दिली जाणार आहे.
advertisement
फॉर्मसाठी अर्जाची फी
अर्जाची फी उमेदवारांच्या श्रेणीनुसार बदलते. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 175 रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील तर इतर सर्व उमेदवारांना 850 रुपये (जीएसटीसह) भरावे लागतील.
येथे सूचना आणि अर्ज लिंक पाहा
advertisement
सेंट्रल बँकेसाठी इतर महत्त्वाची माहिती
या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीवर आधारित असेल. या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 21, 2023 10:52 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Bank Job : सेंट्रल बँकेत 10वी पाससाठी नोकरीची मोठी संधी! बंपर भरती, पगार 28000 पेक्षा जास्त