MPSC RECRUITMENT 2023: एमपीएससीच्या 842 पदांसाठी भरती, 'या' तारखेपासून करता येणार अर्ज
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
MPSC RECRUITMENT 2023: यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे एमपीएससीची माहिती दिली आहे.
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. एमपीएससीतर्फे पुन्हा एकदा आठशेहून अधिक जागांची भरती काढण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे एमपीएससीची माहिती दिली आहे.
राज्य शासनाच्या विभागांतील विविध संवर्गातील 842 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील पाच, गृह विभागातील १०, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एक, सामान्य प्रशासन विभागातील एक, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील ५७, पाणी पुरवठा विभागातील तीन, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील ७६५ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
advertisement
इच्छुक विद्यार्थ्यांनी https://mpsc.gov.in या बेवसाईटवर भेट देऊन तिथे रजिस्ट्रेशन करुन अर्ज भरायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सहायक भूभौतिकतज्ञ, गट ब या संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.134/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण तीन पदांसाठी रिक्त जागा असून शेवटचा अर्ज भरण्यासाची मुदत १ जानेवारी आहे.
या पदांमध्ये गट ‘अ’, गट ‘ब’मधील पदांचा समावेश आहे. पदभरतीच्या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत, प्रवर्गनिहाय तपशील, आवश्यक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम या बाबतची माहिती https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत १ जानेवारी २०२४ असल्याचे एमपीएससीने नमूद केले आहे.
advertisement
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.132/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी रिक्त 26 जागा असून अर्ज करण्याचा शेवटचा जानेवारी 2024 आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2023 10:09 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
MPSC RECRUITMENT 2023: एमपीएससीच्या 842 पदांसाठी भरती, 'या' तारखेपासून करता येणार अर्ज