Railway Recruitment : तरुणांना मोठी संधी! रेल्वेत 3093 पदांसाठी भरती; परीक्षेशिवाय मिळेल नोकरी, असा करा अर्ज
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
प्रशिक्षणार्थीच्या एकूण 3093 रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वेनं अर्ज मागवले आहेत. यासाठी कोणती पात्रता आहे आणि निवड कशी केली जाईल तसंच वयोमर्यादा काय आहे ते जाणून घेऊया.
नवी दिल्ली 08 डिसेंबर : उत्तर रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने शिकाऊ पदांसाठी भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. अर्जाची प्रक्रिया 11 डिसेंबर 2023 रोजी सुरू होईल आणि 1 जानेवारी 2024 रोजी संपेल. उमेदवार नियोजित तारखेपासून rrcnr.org च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ही रिक्त पदं उत्तर रेल्वेच्या विविध विभाग/युनिट/कार्यशाळेत भरली जातील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी रेल्वेने जारी केलेली अधिसूचना वाचणं आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थीच्या एकूण 3093 रिक्त जागा भरण्यासाठी रेल्वेनं अर्ज मागवले आहेत. यासाठी कोणती पात्रता आहे आणि निवड कशी केली जाईल तसंच वयोमर्यादा काय आहे ते जाणून घेऊया.
ही पात्रता आवश्यक
अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसंच, उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं असावं. एनसीव्हीटीने जारी केलेल्या संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. SCVT ला भारत सरकारची मान्यता आहे.
advertisement
वयोमर्यादा – शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावं. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. 11 जानेवारी 2024 पासून वयाची गणना केली जाईल.
advertisement
असा करा अर्ज
रेल्वे rrcnr.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Apprentice Online Application लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्ज करा.
अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
अर्ज फी - सामान्य आणि ओबीसी श्रेणीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. तर SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. अर्जाची फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.
advertisement
निवड प्रक्रिया
शिकाऊ पदांसाठी अर्जदारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्तेद्वारे केली जाईल. गुणवत्ता यादी 12 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2023 8:49 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Railway Recruitment : तरुणांना मोठी संधी! रेल्वेत 3093 पदांसाठी भरती; परीक्षेशिवाय मिळेल नोकरी, असा करा अर्ज