CBSE Vs IB : सीबीएसई आणि आयबीमध्ये काय आहे फरक? मुलांसाठी कोणत्या बोर्डाची निवड करावी?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आपल्या मुलाला जगातील सर्वोत्तम शिक्षण मिळावं ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र आपल्या मुलांसाठी शाळा निवडताना पालकांचा अनेकदा गोंधळ उडतो.
मुंबई, 30 सप्टेंबर : आपल्या मुलाला जगातील सर्वोत्तम शिक्षण मिळावं ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र आपल्या मुलांसाठी शाळा निवडताना पालकांचा अनेकदा गोंधळ उडतो. असाच गोंधळ शिक्षणासाठी कोणतं बोर्ड निवडावं, कोणत्या माध्यमातून मुलांना शिक्षण द्यावं सीबीएसई की आयबी बोर्डाची पाल्याच्या शिक्षणासाठी निवड करावी यावरून देखील होतो. आज आपण हाच गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण सीबीएसई आणि आयबीमधील प्रमुख फरक माहिती करून घेणार आहोत.
सीबीएसई बोर्ड
सीबीएसई बोर्डालाच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असंही म्हटलं जातं. हे राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मंडळ आहे. या शिक्षण मंडळावर भारत सरकारचे नियंत्रण असते. सीबीएसई बोर्डाची स्थापना 1929 मध्ये झाली. सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम खासगी आणि सरकारी अशा दोन्ही शाळांमध्ये शिकवला जातो. ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी स्वायत्त संस्था आहे. सीबीएसई बोर्डाचं मुख्य कार्यालय दिल्लीमध्ये आहे. या बोर्डाचा अभ्यासक्रम तीन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे तीन प्रकार पडतात.
advertisement
आयबी बोर्ड
आयबी बोर्डचा अभ्यासक्रम हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम आहे. आयबी बोर्डाचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे असून, या मंडळाची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली. आयबी ही संस्था ना- नफा ना तोटा या तत्वावर चालते. आयबीचा अभ्यासक्रम हा चार वेगवेगळा विभागात विभागला गेला आहे. ज्यामध्ये 3-12 वर्षांपर्यंतच्या मुलांचा गट, 12 ते 16 वर्षांपर्यंतचा गट 16 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमाचे कार्यक्रम आणि चौथ्या टप्प्यात याच विद्यार्थ्यांसाठी विविध करिअर संबंधित कार्यक्रम असे प्रमुख चार गट पडतात.
advertisement
काय आहे दोन्हीमध्ये फरक?
view commentsसीबीएसई बोर्डाचं नियंत्रण हे भारत सरकारकडून केलं जातं. भारताव्यतिरिक्त सीबीएसई बोर्डाच्या इतर 26 देशांमध्ये 240 शाळा आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी बहुतांश ठिकाणी इंग्रजी हेच माध्यम वापरलं जातं. सीबीएसईप्रमाणे भारतामध्ये प्रत्येक राज्याचं एक वेगळ मंडळ देखील आहे. जा मंडळाद्वारे त्या-त्या राज्याच्या स्थानिक भाषेत परीक्षा घेतल्या जातात. तर आयबी बोर्ड हे जागतिक स्तरावरील बोर्ड आहे. ज्यामध्ये विद्यार्थांसाठी जगातील वेगवेगळ्या देशांची संस्कृती लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केला जातो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2023 1:29 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
CBSE Vs IB : सीबीएसई आणि आयबीमध्ये काय आहे फरक? मुलांसाठी कोणत्या बोर्डाची निवड करावी?