Crime News : फोन उचलला नाही, संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून....बीडमधील धक्कादायक घटना

Last Updated:

Beed News : तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर फोन न उचलल्यामुळे संतापलेला प्रियकर थेट चक्क पहाटेच्या सुमारास प्रेयसीच्या घरात घुसला.

News18
News18
बीड: तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर फोन न उचलल्यामुळे चक्क पहाटे घरात घुसून एका तरुणीला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील स्वराज्यनगर भागात उघडकीस आला आहे. ही घटना 12 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. आरोपीने पीडितेच्या दाजीलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या या युवकाचे नाव लक्ष्मण सपकाळ (वय 25, रा. सुर्डी, ता. गेवराई) असे आहे. त्याच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी ही वडवणी तालुक्यातील असून सध्या बीडमधील एका भाड्याच्या घरात राहते. ती आणि आरोपी लक्ष्मण हे दोघेही एका खासगी रुग्णालयात काम करतात. गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण पीडितेच्या राहत्या घरावर सतत चकरा मारत होता. 12 मे रोजीही तो मद्यधुंद अवस्थेत तिच्या रूमवर यायचा हट्ट करत होता. पीडितेने सकाळी यायला सांगितले तरी त्याने ऐकले नाही.
advertisement
पहाटेच तिच्या खोलीत घुसून, ‘माझा फोन का उचलत नाहीस?’ अशी विचारणा करत गळा दाबला आणि चापटाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी तो सातत्याने जातीवाचक शिवीगाळ करत होता, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
घाबरलेल्या तरुणीने तातडीने आपल्या दाजीला बोलावले असता, लक्ष्मण याने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीसांनी त्वरित लक्ष्मणविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : फोन उचलला नाही, संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून....बीडमधील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement