Crime News Dowry : ना सोनं, ना चांदी, ना कार... हुंड्यात असं काही मागितलं की.... समोर आला धक्कादायक प्रकार

Last Updated:

Crime News : लग्नानंतर सुनेला हुंडा म्हणून सोनं, चांदी किंवा महागडी कार नाही तर भलतंच काही मागितले. सुनेने त्याला नकार दिल्यावर तिला बेदम मारहाण, छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

File photo
File photo
पाटणा: वैष्णवी हगवणे आणि त्यानंतर समोर आलेल्या हुंडाबळी प्रकरणाने एकच खळबळ उडाली. समाजात हुंड्यासाठी होणार्‍या छळाच्या अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर सुनेला हुंडा म्हणून सोनं, चांदी किंवा महागडी कार नाही तर भलतंच काही मागितले. सुनेने त्याला नकार दिल्यावर तिला बेदम मारहाण, छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

हुंड्यासाठी छळ...काय मागितलं?

बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मिथानपुरा पोलीस स्टेशन परिसरातील दीप्ती नावाच्या एका नवविवाहित वधूने महिला पोलीस स्टेशन गाठले आणि तिच्या सासरच्या लोकांवर धक्कादायक आरोप केले. दीप्तीने पोलिसांना सांगितले की, तिच्या सासरच्या लोकांनी सुरुवातीला तिच्या माहेरून हुंडा आणण्यासाठी दबाव आणला. जेव्हा ती हुंडा आणू शकली नाही तेव्हा त्यांनी तिच्या पतीच्या उपचारासाठी तिची किडनी दान करण्याची मागणी केली. किडनी दान करण्यास नकार दिल्याने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून लावण्यात आल्याचा दीप्तीचा आरोप आहे.
advertisement

लग्नाच्या काही दिवसांनंतर वागणूक बदलली

नवविवाहित महिलेने सांगितले की, 2021 मध्ये तिचे लग्न बोचाहान पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाशी झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक चालले, परंतु काही महिन्यांनंतर सासरच्या लोकांचे वर्तन बदलू लागले. त्यांनी तिच्या माहेरून पैसे आणि सायकल आणण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली, तसेच ती काही कामाची नाही अशी टोमणे मारण्यास सुरुवात केली.
advertisement

पतीला किडनीचा विकार...

दरम्यान, लग्नाच्या सुमारे 2 वर्षांनंतर तिच्या नवऱ्याची किडनी खराब असल्याची माहिती दीप्तीला समजली. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी हुंडा आणू शकत नसशील तर एक किडनी द्या, अशी मागणी केली.
सुरुवातीला सामान्यपणे किडनीची मागणी करण्यात आली होती. मात्र, कालांतराने किडनी देण्यासाठी सतत दबाव आणला जात होता. जेव्हा दीप्तीने तिची किडनी देण्यास नकार दिला तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले असल्याचे तिने सांगितले.
advertisement

माहेरी आल्यानंतर तक्रार...

यानंतर दीप्ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आणि महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलावून परस्पर तडजोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु तडजोड होऊ शकली नाही. दीप्ती तिच्या पतीकडून घटस्फोटाची मागणी करत राहिली, परंतु पती घटस्फोट देण्यास तयार नाही. यावर दोघेही सहमत होऊ शकले नाहीत. यानंतर महिला पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 38/25 दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये पतीसह सासरच्या चार जणांना आरोपी करण्यात आले आहे.
advertisement

या प्रकरणाची चौकशी सुरू

या संपूर्ण प्रकरणावर ग्रामीण एसपी विद्यासागर यांनी सांगितले की, मिठनपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या पती आणि सासरच्यांवर किडनी दान करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात महिला पोलिस ठाण्यात अर्ज घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News Dowry : ना सोनं, ना चांदी, ना कार... हुंड्यात असं काही मागितलं की.... समोर आला धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement