PSI अन्नपूर्णा बनली दुर्गा, 5 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दिला भयंकर मृत्यू, थेट एन्काऊंटर

Last Updated:

Encounter News: पाच वर्षांच्या मुलीची कथित अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचं रविवारी एन्काऊंटर करण्यात आलं.

News18
News18
कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीची कथित अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचं रविवारी एन्काऊंटर करण्यात आलं. या प्रकरणी आरोपीला अटक केलं असता, त्याने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. हे एन्काऊंटर दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर एका महिला अधिकाऱ्याने केला आहे. पीएसआय अन्नपूर्णा असं महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.
तर रितेश कुमार (३५) असं आरोपीचं नाव आहे. तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर POCSO (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायद्याअंतर्गत हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. आता पोलिसांवर हल्ला आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केले आणि नंतर तिची हत्या केली. ही घटना हुबळी येथील अशोक नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह एका मोकळ्या इमारतीत सापडला.
advertisement
हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी सांगितलं की, "सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेत, त्याची तीन ते चार तास चौकशी करण्यात आली. पण त्याने खूप कमी माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो गुन्हा करताना स्पष्टपणे दिसून येत होता. मात्र तरीही तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता.
advertisement
आयुक्तांनी पुढे सांगितलं की, आरोपी अनेक वर्षांपासून त्याच्या घरापासून दूर राहत होता. त्याला जिथे काम मिळेल तिथे तो काम करायचा. दोन ते तीन महिन्यांपूर्वीच तो हुबळी येथे आला होता आणि तारिहाला अंडरपासजवळील एका रिकाम्या इमारतीत तो राहत होता. त्याची ओळख पटवण्यासाठी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तो जिथे राहत होता तिथे त्याला नेण्यात आले. यावेळी त्याने अचानक पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. अधिकाऱ्यांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला अधिकारी पीएसआय अन्नपूर्णा यांनी आरोपीला इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण तो थांबला नाही, तेव्हा अन्नपूर्णा यांनी त्याच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडल्या. ज्यातली एक गोळी त्याच्या पायाला लागली आणि दुसरी त्याच्या पाठीला लागली."
advertisement
advertisement
या एन्काऊंटरमध्ये आरोपी बेशुद्ध पडला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत पीएसआय अन्नपूर्णा आणि यशवंत आणि वीरेश हे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत पण त्यांची स्थिती धोक्याबाहेर आहे, असंही पोलीस आयुक्त एन शशीकुमार यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/क्राइम/
PSI अन्नपूर्णा बनली दुर्गा, 5 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दिला भयंकर मृत्यू, थेट एन्काऊंटर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement