'मी तुझा बॉयफ्रेंड', बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या; तिघांना अटक
- Published by:Prachi Amale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणांनी बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
नाशिक: नाशिकच्या अंबड परिसरात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणांनी बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी गणेश भांगरे, अक्षय वरठे आणि अतिश वैद्य अशी संशयितांची नावे समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच महाविद्यालयात शिकत होते. गणेश भांगरे याच्यासोबत जबरदस्ती प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी तिला केली जात होती. मात्र पीडित मुलीने नकार दिल्यानंतर संशयित अतिश वैद्य याने तिचा इंस्टाग्राम आयडी आणि पासवर्ड घेतला. त्यानंतर मुलगी आणि एका तरुणाचा एकत्र फोटो तिच्या अकाऊंटवर पोस्ट करून "बॉयफ्रेंड आहे" असा मजकूर टाकला. या घटनेमुळे पीडित मुलीची महाविद्यालयीन परिसरात बदनामी झाली.
advertisement
शिवीगाळ करत मानसिक त्रास दिल्याचे तपासात समोर
याचदरम्यान गणेश भांगरे यानेही पीडितेला वारंवार फोन करून शिवीगाळ करत मानसिक त्रास दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या सर्व दडपणामुळे पीडित मुलगी नैराश्यात गेली आणि अखेर तिने राहत्या घरात सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंबड परिसरात हळहळ
या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी अतिश वैद्य हा आरोपी सध्या फरार आहे. अंबड पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे अंबड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
August 25, 2025 3:43 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'मी तुझा बॉयफ्रेंड', बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या; तिघांना अटक


