Thane Crime News : ठाणे हादरलं! नामांकित शाळेत झाला 7 वर्षाच्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, पोलिसांनी काय सांगितलं?
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
Thane Crime News : ठाण्यातील एका नामांकित शाळेत केवळ 7 वर्षांच्या शाळकरी मुलीवर शाळेच्या शौचालयात लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ठाणे: महिलांसह अल्पवयीन मुलींच्या सुरक्षितेवर चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील एका नामांकित शाळेत केवळ 7 वर्षांच्या शाळकरी मुलीवर शाळेच्या शौचालयात लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.
ही घटना 30 जुलै रोजी घडली असून, पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबात तिने निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या एका अज्ञात व्यक्तीकडून लैंगिक छळ झाल्याचे सांगितले आहे. सुरुवातीला ही तक्रार नवघर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती, मात्र संबंधित शाळा वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे तपास वर्तकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
तीन पथके, सीसीटीव्ही फूटेजने आरोपीचा शोध...
advertisement
पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून, तीन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 29 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीतील CCTV फुटेजची पाहणी केली आहे. मात्र, प्राथमिक तपासात फुटेजमध्ये कोणतीही संशयित व्यक्ती स्पष्टपणे आढळून आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तरीही, पोलिसांकडून निळ्या रंगाचा शर्ट घालून शाळेच्या परिसरात कोण प्रवेश करत होता, याबाबत सखोल तपास सुरू आहे. शाळेप्रमाणे सुरक्षित वातावरण असलेल्या ठिकाणी घडलेला हा प्रकार पालक वर्गात तीव्र चिंता आणि अस्वस्थता निर्माण करणारा आहे.
advertisement
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या जबाबाच्या आधारे कोणत्याही दृष्टीने तपास कमी न करता, सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. या प्रकरणातील दोषी व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांकडून आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय, आरोपीचा शोध लागावा यासाठी सर्व प्रकारे तपास करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
August 05, 2025 1:00 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Thane Crime News : ठाणे हादरलं! नामांकित शाळेत झाला 7 वर्षाच्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, पोलिसांनी काय सांगितलं?


