आईने पोटच्या 4 लेकरांना पाण्याच्या टाकीत फेकलं; चौघांचा तडफडून मृत्यू, मग केलं धक्कादायक कृत्य
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
एका आईने आपल्या चार मुलांना पाण्याच्या टाकीत फेकून त्यांचा जीव घेतला. पुढे तिने जे केलं तेदेखील धक्कादायक होतं.
जयपूर : आपल्या मुलांना संकटातून बाहेर काढण्यासाठी एक आई काहीही करू शकते, असं म्हणतात. मग ती स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही. आपल्या लेकरांसाठी ती स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही तयार असते. मात्र, काही वेळा अशाही घटना समोर येतात, ज्यात आई-वडीलच मुलांचा जीव घेतात. असंच एक धक्कादायक आणि हादरवणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका आईने आपल्या चार मुलांना पाण्याच्या टाकीत फेकून त्यांचा जीव घेतला. पुढे तिने जे केलं तेदेखील धक्कादायक होतं.
ही घटना राजस्थानच्या बाडमेरमधून समोर आली आहे. ज्यात एका आईने आपल्या चार मुलांना पाण्याच्या टाकीत फेकलं. मग स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चारही लेकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर, महिलेचा जीव वाचवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
advertisement
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, रविवारी जिल्ह्यातील सदर भागातील धने का तला गावात ही घटना घडली. यात एका महिलेने आपल्या चार मुलांना पाण्याच्या टाकीत फेकून दिलं आणि नंतर स्वत:ही पाण्यात उडी घेतली. प्राथमिक तपासात पोलिसांना समजलं की, ही महिला कौटुंबिक वादामुळे त्रस्त होती. यातूनच तिने हे पाऊल उचललं.
advertisement
बाडमेरचे पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह मीना म्हणाले, 'एका महिलेनं पाण्याच्या टाकीत टाकल्याने तिच्या चार मुलांचा मृत्यू झाला. महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमागील कारण जाणून घेण्यासाठी तिची चौकशी करण्यात येणार आहे. टाकीत बुडालेल्या सर्व मुलांचे वय 5 ते 11 वर्षे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती मजुरीचे काम करतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 03, 2024 8:24 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
आईने पोटच्या 4 लेकरांना पाण्याच्या टाकीत फेकलं; चौघांचा तडफडून मृत्यू, मग केलं धक्कादायक कृत्य


