Pawan Kalyan Son Injured: श्वास घ्यायला त्रास, हातपायाला दुखापत, अभिनेते पवन कल्याणचा मुलगा गंभीर जखमी

Last Updated:

Pawan Kalyan son injured:   प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या मुलाला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

अभिनेते पवन कल्याणचा मुलगा गंभीर जखमी
अभिनेते पवन कल्याणचा मुलगा गंभीर जखमी
मुंबई :  प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या मुलाला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याच्या मुलाच्या शाळेत आग लागली असून यामध्ये त्यांचा मुलगा आणि अजून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सध्या सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर पवनोविच सध्या शारीरिक दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूरमधील त्यांच्या शाळेत अचानक आग लागली, आणि या दुर्घटनेत मार्कच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याचसोबत, धुरामुळे श्वास घेण्यास अडचण होऊ लागल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
advertisement
ANI ने त्यांच्या X (पूर्वीचं ट्विटर) हँडलवरून ही माहिती शेअर केली. त्यांनी लिहिलं की, “सिंगापूरमधील एका शाळेत आग लागली असून, आंध्र प्रदेशचे डिप्टी सीएम पवन कल्याण यांचा मुलगा या दुर्घटनेत जखमी झाला आहे.”
advertisement
या घटनेची माहिती मिळताच, पवन कल्याण यांना सिंगापूरला लगेच रवाना होण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्यांनी सध्या मन्यम जिल्ह्यात सुरू असलेल्या दौऱ्याला प्राधान्य दिलं आहे. “मी या भागातील आदिवासी जनतेला काही आश्वासनं दिली आहेत. त्या वचनांशी मी प्रामाणिक आहे. त्यामुळे दौरा पूर्ण केल्यावरच मी सिंगापूरला जाईन”, असं पवन कल्याण म्हणाले.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pawan Kalyan Son Injured: श्वास घ्यायला त्रास, हातपायाला दुखापत, अभिनेते पवन कल्याणचा मुलगा गंभीर जखमी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement