परिणीतीनंतर अरबाज खाननेही केलं लेकीचं नामकरण! खान कुटुंबात चार पिढ्यांनीही ऐकलं नसेल असं नाव

Last Updated:

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या मुलीचं नाव नीर, तर अरबाज खान आणि शूरा यांनीही त्यांच्या मुलीचं बारसं केलं. अरबाज 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.

News18
News18
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी नुकतंच त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं. मुलगी एक महिन्यांची झाल्यानंतर त्यांनी तिचं बारसं केलं. नीर असं परिणीती आणि राघवच्या मुलीचं नाव आहे. परिणीतीनं आता अभिनेता अरबाज खान याने देखील त्याच्या मुलीचं बारसं केलं. मुलीची पहिली झलक त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
5 ऑक्टोबर रोजी अरबाज खान आणि शूरा यांच्या घरी मुलीचं आगमन झालं. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी तिचं नाव देखील ठेवलं.  त्यांनी मुलीचं नाव सिपारा असं ठेवलं आहे. अरबाज आणि शूरा यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सिपाराचे लहान पाय आणि लहान हात दिसतात. एका फोटोमध्ये अरबाज आणि शूरा त्यांच्या मुलीचे लहान पाय धरलेले दिसतात. दुसऱ्या फोटोमध्ये सिपारा तिच्या वडिलांचा अंगठा धरलेली दिसते. "लहान हात आणि लहान पाय, पण आमच्या हृदयाचा सर्वात मोठा भाग" असं म्हणत अरबाज आणि शूरा यांनी मुलीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
अरबाज खान आणि शूरा यांनी एक वर्षांआधी लग्न केलं. वयाच्या 58 व्या वर्षी अरबाज खान पुन्हा एकदा बाबा झाला. शूरा ही  मेकअप आर्टिस्ट असून दोघांचं लव्ह मॅरेज आहे. अरबाज खान आणि शूरा खान यांनी 24 डिसेंबर 2023 रोजी लग्न केले. त्यांचा निकाह अर्पिता खान शर्माच्या मुंबईतील घरी पूर्णपणे खाजगी समारंभात पार पडला.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by sshura Khan (@sshurakhan)



advertisement
लग्नानंतर अरबाजने एक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, "आम्ही आमच्या प्रियजनांमध्ये एक नवीन आयुष्याची सुरू केली आहे. आम्हाला फक्त आशीर्वादांची आवश्यकता आहे." त्यांच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. या जोडप्याच्या साध्या लग्नाची खूप चर्चा झाली आणि आता त्यांच्या मुलीच्या जन्माने आनंद द्विगुणित केला आहे.
advertisement
अरबाज खान 20 वर्षांनी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अरबाजची पहिली पत्नी मलायकापासून त्याला अरहान हा मुलगा आहे. तो आता 22 वर्षांचा आहे. डिवोर्सनंतर अरबाज आणि मलायका अरहानसाठी पालक म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या निभावताना दिसले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
परिणीतीनंतर अरबाज खाननेही केलं लेकीचं नामकरण! खान कुटुंबात चार पिढ्यांनीही ऐकलं नसेल असं नाव
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement