1 घटस्फोट 1 ब्रेकअप, आता 22 वर्षांनी लहान मुलीबरोबर लग्न करतोय मलायकाचा एक्स नवरा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
घटस्फोटानंतर अरबाज काही वर्ष एकटा राहिला. मध्यंतरी त्याचं नाव एका मुलीशी जोडण्यात आलं होतं.
मुंबई, 21 डिसेंबर : अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानसंबंधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अरबाज नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. आताही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अरबाज दुसरं लग्न करणार असल्याची माहिती आहे. वयाच्या 56व्या वर्षी अरबाज खान लग्न करणार असल्याचं कळल्यानंतर सगळ्यांच्यात भुवया उंचावल्या आहेत. अरबाजचं पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोराबरोबर झालं होतं. मात्र त्यांच्या घटस्फोटानंतर अरबाज काही वर्ष एकटा राहिला. मध्यंतरी त्याचं नाव एका मुलीशी जोडण्यात आलं होतं. मात्र त्याचंही ब्रेकअप झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अरबाज खान अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात नवं प्रेम आलं आहे. कोण आहे अरबाजची होणारी बायको पाहूयात. अरबाज हा सलमान खानचा सख्खा भाऊ आहे. दोघांना एक बहिण आहे जिचं नाव अलविर खान अग्निहोत्री. अरबाज हा सलमान खानचा मोठा भाऊ आहे.
न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, अरबाजच्या गर्लफ्रेंडच नाव शौरा खान असं आहे. शौराचं अभिनेत्री रवीना टंडन हिच्या खास कनेक्शन आहे. अरबाज आणि शौर त्यांच्या रिलेशनमध्ये खूप सीरियस आहेत. दोघांना त्यांचं नाव लग्नापर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे.
advertisement
हेही वाचा - Dunki First Review : शाहरूखचा डंकी बॉलिवूडचा 'मास्टरपीस'; प्रेक्षक रिव्ह्यू काय म्हणतोय?
अरबाज आणि शौरा त्यांच्या लग्नाचं प्लानिंग करत असून ते जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न करणार आहेत. दोघांना त्यांचं लग्न जवळच्या माणसांमध्ये करायचं आहे. असं असलं तरी अरबाजनं त्याच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
advertisement
अरबाज खान पटना या त्याच्या अपकमिंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सिनेमाच्या सेटवर त्याची आणि शौराची भेट झाली होती. अरबाज खान यावेळी कोणत्याही अभिनेत्री प्रेमात नाही तर एका मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला आहे. शौरा ही अभिनेत्री रवीना टंडन आणि मुलगी राशा यांची मेकअप आर्टिस्ट आहे.
2017मध्ये अरबाज आणि मलायका यांचं लग्न झालं. परंतू एका मुलाच्या जन्मानंतर त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. मलायकाबरोबरच्या घटस्फोटानंतर अरबाज जॉर्जिया हिच्या प्रेमात पडला होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 21, 2023 1:38 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
1 घटस्फोट 1 ब्रेकअप, आता 22 वर्षांनी लहान मुलीबरोबर लग्न करतोय मलायकाचा एक्स नवरा