Avika Gor Engagement: 'बालिका वधू' फेम अविका गौरचा गुपचूप साखरपुडा, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Avika Gor Engagement: 'बालिका वधू' मालिकेतील गोंडस आनंदी आठवतेय ना? तिच अविका गौर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
मुंबई : 'बालिका वधू' मालिकेतील गोंडस आनंदी आठवतेय ना? तिच अविका गौर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तिनं चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. तिचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
अविकाने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर करत तिच्या प्रेमाचा आणि नात्याचा खास क्षण शेअर केला आहे. प्रियकर मिलिंद चांदवानीसोबत साखरपुडा केला. ती गुलाबी साडीत आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये खूपच गोड दिसत होती. मिलिंदनेही बेज रंगाची शेरवानी घालून अत्यंत सोज्वळ लूक ठेवला होता.
advertisement
या पोस्टमध्ये अविकाने आपल्या भावना अगदी फिल्मी शैलीत लिहिल्या. तिने सांगितले की मिलिंदने प्रपोज करताच ती हसली, रडली आणि हो म्हणाली.मिलिंद यानेही तिच्या पोस्टवर खास कमेंट केली. त्याने म्हटलं, “तू नाटक आहेस, मी दिग्दर्शन करतोय, चला मिळून एक सुंदर चित्रपट बनवूया.”
advertisement
कोण आहे मिलिंद चांदवानी?
मिलिंद चांदवानी एक सोशल वर्कर आहे. तो ‘एमटीव्ही रोडीज’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला होता. त्याने ‘Camp Diaries’ नावाचं एक NGO सुरू केलं आहे.
अविका आणि मिलिंद एकमेकांना समाजसेवेच्या कामात भेटले. ते हळूहळू चांगले मित्र झाले आणि त्या मैत्रीतून विश्वासाचं आणि काळजीचं नातं तयार झालं. अविकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “मिलिंदसारखं व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी नवीन होतं शांत, समजूतदार आणि खंबीर.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 11, 2025 7:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Avika Gor Engagement: 'बालिका वधू' फेम अविका गौरचा गुपचूप साखरपुडा, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज!