BBM6 च्या घरात वातावरण होणार हॉट-हॉट, नखरेल गर्ल शोच्या ग्रँड प्रीमिअरला लावणार चार चाँद! तुम्ही ओळखलं का?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीने एका अशा बोल्ड सुंदरीचा प्रोमो शेअर केलाय, ज्याने इंटरनेटचा पारा चढवला आहे.
मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या घराचं दार उघडायला आता अवघे ७२ तास उरले आहेत आणि सोशल मीडियावर जणू काही नावांचं युद्धच सुरू झालंय. रितेश भाऊंच्या या खेळात कोण कोण राडा घालायला येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच कलर्स मराठीने एका अशा बोल्ड सुंदरीचा प्रोमो शेअर केलाय, ज्याने इंटरनेटचा पारा चढवला आहे. विशेष म्हणजे, चेहरा लपवूनही नेटकऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून ही अभिनेत्री वाचू शकलेली नाही. तिच्या एका छोट्याशा टॅटूने तिचं नाव जगासमोर आणलं आहे.
सौंदर्य आणि बोल्डनेसचा हॉट तडका
कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो प्रसिद्ध केला असून त्यात एक अभिनेत्री अत्यंत ग्लॅमरस अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या प्रोमोला कॅप्शन दिलंय, "सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातावरण हॉट-हॉट करायला येतेय ही नखरेल गर्ल..." प्रोमोमध्ये तिचा चेहरा जरी गुलदस्त्यात असला, तरी तिच्या मादक हालचालींनी आणि सादरीकरणाने चाहत्यांना घायाळ केलं आहे. पण एका हुशार नेटकऱ्याने तिच्या कंबरेवरचा टॅटू पाहिला आणि क्षणात ओळखलं की ही दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली राऊत आहे.
advertisement
advertisement
कोण आहे ही सोनाली राऊत?
सोनाली राऊत हे नाव बिग बॉसच्या चाहत्यांसाठी नवीन नाही. तिने याआधी सलमान खानच्या 'बिग बॉस ८' मध्ये धुमाकूळ घातला होता. 'द एक्सपोज' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांतून आपल्या बोल्डनेसची चुणूक दाखवणारी सोनाली आता मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. हिंदी बिग बॉसमध्ये ती आपल्या रोखठोक वागण्यासाठी आणि भांडणांसाठी प्रसिद्ध होती, त्यामुळे मराठीच्या घरात ती काय धिंगाणा घालणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
advertisement
केवळ सिनेसृष्टीतील चेहरेच नाही, तर यंदा सोशल मीडिया गाजवणारे रीलस्टार्स् सुद्धा घरात एन्ट्री घेणार आहेत. सोनालीच्या प्रोमोसोबतच एका लोकप्रिय रीलस्टारचाही सूचक प्रोमो समोर आला आहे. "सोशल मीडियावर ज्यांच्या एका व्हिडिओसाठी लाखो लोक वाट पाहतात, तो गडी आता थेट बिग बॉसच्या घरात दिसणार," अशी चर्चा रंगली आहे. यामुळे यंदाचा सीझन जबरदस्त ठरणार आहे.
advertisement
उरले फक्त ३ दिवस
११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता रितेश देशमुख या खेळाचा श्रीगणेशा करतील. या महासोहळ्यात सोनाली राऊत आपला तोच 'बोल्ड' अवतार घेऊन मंचावर येते का, हे पाहणं रंजक ठरेल. यासोबतच राधा मुंबईकर सारख्या नृत्यांगनेच्या नावाचीही चर्चा जोरात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 10:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM6 च्या घरात वातावरण होणार हॉट-हॉट, नखरेल गर्ल शोच्या ग्रँड प्रीमिअरला लावणार चार चाँद! तुम्ही ओळखलं का?










