Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'च्या घराला मिळाले 'TOP 5' स्पर्धक! चार दिवसांतच होणार विजेत्याची घोषणा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 Contestants : 'बिग बॉस 19' हा लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम पुढच्या पाच दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार असून अशातच एका दमदार खेळाडूचा प्रवास संपला आहे. आता 'TOP 5' स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम पुढच्या पाच दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 7 डिसेंबर 2025 रोजी या पर्वाच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. त्यामुळे स्पर्धकांसह प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 'वीकेंड का वार'ला दोन स्पर्धकांचा प्रवास संपला होता. शारीरिक हिसांचारामुळे अशनूर कौर आणि कमी वोट्स मिळाल्याने शहबाज बदेशा घराबाहेर पडले होते. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही 'बिग बॉस 19'च्या घरात मिड वीक एविक्शन पार पडलं आहे. त्यामुळे घराला 'TOP 5' स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे आता यापैकी 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी कोण आपल्या नावे करणार हे जाणून घेण्याची 'बिग बॉस'प्रेमींना उत्सुकता आहे.
'बिग बॉस 19'च्या घरात पार पडला एविक्शन टास्क
'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच 'मिड वीक एविक्शन' टास्क पार पडला आहे. या आठवड्यात बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी फरहाना भट्ट, तान्या मित्तल, मालती चाहर, प्रणित मोरे आणि अमाल मलिक नॉमिनेट होते. पण नुकताच घरात एक नवा टास्क पार पडला आहे. नॉमिनेट झालेल्या सर्व स्पर्धकांना गार्डन एरियामध्ये बोलावून एक टास्क खेळला गेला.
advertisement
'या' स्पर्धकाचा प्रवास संपला
'बिग बॉस खबरी'च्या रिपोर्टनुसार, क्रिकेटर दीपक चाहरची बहिण आणि अभिनेत्री मालती चाहरचा 'बिग बॉस 19'मधला प्रवास संपला आहे. त्यामुळे 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकण्याचं मालतीचं स्वप्न आता अधुरं राहिलं आहे. कमी वोट्स मिळाल्याने मालती घराबाहेर पडली आहे.
advertisement
कोण आहेत TOP 5 स्पर्धक? (Bigg Boss 19 TOP 5 Contestants)
view commentsमालती चाहर घराबाहेर पडल्यानंतर 'बिग बॉस 19'च्या TOP 5 स्पर्धकांची नावे समार आली आहेत. 'टॉप 5'मध्ये तान्या मित्तल, गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे या स्पर्धकांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धकांत पुढचे 4-5 दिवस तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या पाच जणांपैकी एक जण या पर्वाचा विजेता होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 8:41 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'च्या घराला मिळाले 'TOP 5' स्पर्धक! चार दिवसांतच होणार विजेत्याची घोषणा


