'बादशाह' चित्रपटातील छोटी सोनू झाली खूपच ग्लॅमरस! फिल्मी कुटुंबाशी आहे खास कनेक्शन

Last Updated:

Bollywood Child Actor : शाहरुखच्या बादशाह चित्रपटातील छोटी सोनू आता दिसते एकदम सुंदर. फिल्मी कुटूंबासोबत तिचे खास कनेक्शन आहे.

News18
News18
बॉलिवूडमध्ये असे काही बालकलाकार आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. त्यांचे हावभाव, अभिनय आणि निरागस चेहरा यांची प्रेक्षकांना भूरळ पडते. 90 च्या दशकात किंग शाहरुखचा असा एक चित्रपट आला होता. त्यात अशीच बालकलाकार होती ती आता मोठी झाली आहे. तिची चित्रपटासाठी झालेली निवड ही सुध्दा रंजक आहे. तिचे नाते संबंध फिल्मी कुटूंबासोबत जोडलेले आहे. आता ती खूपच सुंदर दिसते.
फिल्मी कुटूंबासोबत नाते 
अभिनेता शाहरुखचा 'बादशाह' नावाचा चित्रपट आला होता. चित्रपटातील बादशाहची मुलगी म्हणजेच छोटी सोनू सगळ्यांनाच आठवते. या सोनूने त्यातील गुंडांना खूपच सळो की पळो करुन सोडले होते. ती बालकलाकार होती करिश्मा जैन छज्जर. जी फिल्म प्रोड्यूसर गिरीश जैन यांची मुलगी होती, तर रतन जैन यांची ती भाची होती. तिचे हे नाते या फिल्मी कुटुंबासोबत होते. करिश्मा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
advertisement
बादशाह चित्रपट 1999 मध्ये आला होता. या चित्रपटाला जास्त काही बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवता आला नाही. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या चित्रपटात शाहरुखने बादशाह नावाच्या गुप्तहेराची भूमिका केली होती. त्यात एक सीन होता की एका लहान मुलीचे अपहरण होते. तिला वाचण्यासाठी सीएमला तो मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो एका मुलीसोबत बिल्डींगवरुन उडी मारतो.
advertisement
advertisement
असा मिळाला होता करिश्माला चित्रपट
करिश्मा एका मुलाखतीमध्ये म्हणाली, "मला एका डान्स साठी उभं केलं होतं. त्यावेळी मला फिल्ममेकर अब्बास मस्तान यांनी पाहिले. तेव्हा मला माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट मिळाला. शूटींगच्यावेळी शाहरुख अब्बासला म्हणाला, 'बेबी जास्त वजनाची आहे.' त्यानंतर त्याने सीन बदलला आणि माझा हाथ पकडून पळायचा सीन केला."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'बादशाह' चित्रपटातील छोटी सोनू झाली खूपच ग्लॅमरस! फिल्मी कुटुंबाशी आहे खास कनेक्शन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement