Bollywood Movie : बॉलिवूडची 'शापित' फिल्म! शूटिंग सुरू असतानाच 2 अॅक्टर आणि डायरेक्टरचा मृत्यू, 23 वर्षांनी रिलीज झाली, तेव्हाही नको तेच घडलं
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Movie : बॉलीवूडच्या या चित्रपटाला तयार होण्यासाठी 23 वर्षे लागली. या काळात चित्रपटाशी संबंधित दोन अभिनेता आणि दिग्दर्शक याचा मृत्यू झाला.
Bollywood Movie : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झाली आहे. वर्षानुवर्षे हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्याला इंडस्ट्रीतील एक महत्त्वाचा चित्रपट मानलं जातं. या चित्रपटाची निर्मिती पूर्ण होण्यासाठी तब्बल 23 वर्षांचा कालावधी लागला. नंतर जरी हा चित्रपट प्रदर्शित झाला, तरी या काळात चित्रपटाशी संबंधित दोन अभिनेत्यांचा आणि स्वतः दिग्दर्शकाचा मृत्यू झाला. अनेक अडथळ्यांनंतर जेव्हा हा चित्रपट थिएटरपर्यंत रिलीज झाला तेव्हा त्याला प्रेक्षकांची पसंती मिळालीच नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.
1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित चित्रपटाचं नाव 'लव अँड गॉड' असं आहे. निम्मी आणि संजीव कुमार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. 'मुगल-ए-आझम' सारखा भव्य आणि ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणाऱ्या के. आसिफने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. मुगल-ए-आझम प्रमाणेच के. आसिफ यांना ‘लव अँड गॉड’ हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात तयार करायचा होता. पण दुर्दैवाने त्यांना त्यात यश आलं नाही.
advertisement
मुगल-ए-आजम सारख्या महान चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर के. आसिफ यांना 'लव अँड गॉड' हादेखील एक ऐतिहासिक चित्रपट निर्माण करायचा होता. लैला-मजनू यांच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेत्री निम्मीने लैला आणि संजीव कुमारने मजनूची भूमिका साकारली होती. संजीव कुमारआधी गुरु दत्त या चित्रपटात मजनूची भूमिका साकारणार होते.
advertisement
अन् अभिनेत्याचा मृत्यू...
के आसिफने गुरु दत्त साहब यांची आपल्या 'लव अँड गॉड' चित्रपटातील मजनूच्या भूमिकेसाठी निवड केली होती. त्यादरम्यान गुरू दत्त यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बॉक्स ऑफिसवर त्यांचे चित्रपट फ्लॉप होत होते त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. पत्नी गीता दत्तनेही आपलं घर सोडलं होतं. त्यानंतर अचानक गुरू दत्त यांचे निधन झाले आणि 'लव अँड गॉड' चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं.
advertisement
दिग्दर्शकाचं निधन, चित्रपट फ्लॉप
गुरु दत्तच्या निधनानंतर के.आसिफने संजीव कुमारला मजनूच्या भूमिकेसाठी निवडलं. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अशातच 1971 मध्ये दिग्दर्शक के. आसिफचे निधन झाले आणि चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले. पण संजीव कुमारला के. आसिफ यांचं स्वप्नवत प्रोजेक्ट पूर्ण करायचं होतं. त्यामुळे त्यांनी अनेक निर्मात्यांना याबद्दल विचारणा केली. निर्माते केसी बोकाडियाने या चित्रपटासाठी अर्थसहाय्य देण्यास ठरवले. त्यानंतर पुन्हा एकदा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. दरम्यान संजीव कुमारचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अखेर 23 वर्षांनी 1986 मध्ये 'लव्ह अँड गॉड' हा चित्रपट रिलीज झाला. पण बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 12:38 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bollywood Movie : बॉलिवूडची 'शापित' फिल्म! शूटिंग सुरू असतानाच 2 अॅक्टर आणि डायरेक्टरचा मृत्यू, 23 वर्षांनी रिलीज झाली, तेव्हाही नको तेच घडलं