40 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अडकला, 'स्टूडेंट ऑफ द ईयर'मधील 'तो' अभिनेता कोण?

Last Updated:

Vishal Brahma : 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2'फेम अभिनेता विशाल ब्रह्मा ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. पोलीसांनी 40 कोटींच्या अमली पदार्थांसह ताबा घेतला आहे.

News18
News18
Vishal Brahma : सिने इंडस्ट्रीतील आणखी एका अभिनेत्याचं नाव ड्रग्ज प्रकरणी जोडलं गेलं आहे. बॉलिवूडमधील स्ट्रगलर अभिनेता विशाल बह्मा याला चेन्नई एअरपोर्टवरुन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचा रेवेन्यू इंटेलिजेंस निदेशालयाने (DRI) 40 कोटी रुपयांच्या मेथाक्वालोन या अमली पदार्थांसह ताबा घेतला आहे. विशाल हा आसाममध्ये राहणारा आहे. एअर इंडियाच्या AI 347 या फ्लाइटने तो सिंगापुरला गेला होता. तिथून चैन्नईला पोहोचलाच DRI ने त्याला ताब्यात घेतलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका गँगने विशालाल यात अडकवलं आहे. पैशांमुळे विशाल अशा गोष्टींकडे ओढला गेला.
विशालला सुट्टी घालवण्यासाठई कंबोडियाला पाठविण्यात येणार होते. पण परतीच्या प्रवासादरम्यान त्याला एक ट्रॉली बॅग सोबत घेऊन येण्यास सांगितले. ही ट्रॉली बॅग पूर्णपणे ड्रग्जने भरलेली होती. यासगळ्या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न अधिकारी सध्या करत आहेत.
advertisement
कोण आहे विशाल ब्रह्मा?
विशाल ब्रह्मा 2019 मध्ये आलेल्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला होता. सम्राट असं त्याच्या भूमिकेचं नाव होतं. चित्रपटात त्याने एका महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारली होती. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडेसोबत त्याने काम केलंय. चित्रपटात विशालची सहाय्यक भूमिका असली तरी त्याचं काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं होतं. आजवर अनेक कलाकृतींचा तो भाग राहिला आहे. पण इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करता मात्र आलेलं नाही.
advertisement
विशाल सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रीय आहे. जिम, वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. विशालला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबियांची अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही. बॉलिवूडमध्ये स्ट्रगल सुरू असलेल्या विशालचा आता ड्रग्जप्रकरणानंतर आणखी संघर्ष वाढणार का? त्यातून तो कसं कमबॅक करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
40 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अडकला, 'स्टूडेंट ऑफ द ईयर'मधील 'तो' अभिनेता कोण?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement