Movies : 'हे' 9 चित्रपट तुमच्या मुलांनी आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवे! या वीकेंडला आताच करा 1 फिक्स

Last Updated:

Bollywood Movies : बॉलिवूडचे काही चित्रपट तुमच्या मुलाने आयुष्यात एकदा तरी पाहायला हवे असे आहेत. हे चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या पाल्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.

News18
News18
Bollywood Movies : बॉलिवूडसह जगभरात विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या, वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होत असते. तुमच्या मुलाला सिनेमा या जादूई जगाशी ओळख करून द्यायची असो किंवा प्रभावी कथा सांगण्याच्या माध्यमातून त्याला जीवनमूल्यं शिकवायची असो, काही चित्रपट असे असतात जे मनावर कायमचा ठसा उमटवतात. मग तो 'द लायन किंग'सारखा आयकॉनिक अ‍ॅनिमेशन असो किंवा 'डेड पोएट्स सोसायटी'मधील रॉबिन विल्यम्सचा भावनिक अभिनय असो. हे चित्रपट केवळ करमणूक करत नाहीत, तर आयुष्याचे धडे गिरवतात, कल्पनाशक्ती जागवतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात.
1. द लायन किंग (1994) :
जबाबदारी आणि वारशाचा धडा. सिंहाचा बालपणापासून प्रौढत्वापर्यंतचा प्रवास या चित्रपटात योग्य पद्धतीने दाखविण्यात आला आहे. त्यात शौर्य, दुःख आणि नशीब या संकल्पनांची प्रभावी मांडणी आहे. प्रत्येक मुलाने हा चित्रपट अनुभवायलाच हवा.
advertisement
2. द पर्सूट ऑफ हॅपिनेस (2006) :
संघर्षातून यशाकडे. विल स्मिथचा संघर्षमय प्रवास मुलांना चिकाटी आणि आशेचा खरा अर्थ शिकवतो. स्वतःवर विश्वास आणि कठोर मेहनतीमुळे काहीही शक्य आहे, हे चित्रपटातून अधोरेखित होते. जेडन स्मिथने या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं.
3. टू किल अ मॉकिंगबर्ड (1962) :
न्याय आणि सहवेदनेचा धडा. 'टू किल अ मॉकिंगबर्ड' हा साहित्यकृतीवर आधारित चित्रपट वडिलांच्या मार्गदर्शनातून न्याय, सहवेदना आणि वर्णभेदविरोधातील लढा यांचे मोल शिकवतो. एका मुलाच्या नजरेतून या गोष्टी अनुभवता येतात.
advertisement
4. द कराटे किड (1984) :
शिस्त आणि आत्मविश्वासाचे महत्त्व. "वॅक्स ऑन, वॅक्स ऑफ" इतकंच नाही — हा चित्रपट शिकवतो की, अंतःशक्ती आणि शिस्तबद्ध सरावाने कोणत्याही आव्हानावर मात करता येते. केवळ बळ नाही तर मनोबळ जास्त महत्त्वाचे.
5. डेड पोएट्स सोसायटी (1989) :
स्वतःची विचार करण्याची पद्धत बदलणारा 'डेड पोएट्स सोसायटी' हा चित्रपट आहे. रॉबिन विल्यम्सचा प्रेरणादायक अभिनय मुलांना विचार करण्याची आणि स्वतःचा मार्ग शोधण्याची प्रेरणा देतो. हा चित्रपट विचारसरणीला चालना देतो आणि "कर्म" पेक्षा "दृष्टिकोन" महत्त्वाचा आहे हे शिकवतो.
advertisement
6. स्पायडर-मॅन: इन्टू द स्पायडर-वर्स (2018) :
कोणताही माणूस हिरो होऊ शकतो. विविधतेने भरलेली, विज्युअली कमाल अ‍ॅनिमेटेड ही कथा शिकवते की कोणत्याही पार्श्वभूमीतून आलेली व्यक्ती धैर्य आणि मनापासून प्रयत्न केल्यास असामान्य बनू शकते.
7. लाईफ ऑफ पाय (2012) :
श्रद्धा, भीती आणि टिकाव. समुद्रात अडकलेल्या मुलाच्या प्रवासाची ही जादुई आणि तात्त्विक कथा आपल्याला श्रद्धा, कल्पनाशक्ती आणि अंतर्गत शक्ती यांचं महत्त्व शिकवते.
advertisement
8. स्टँड बाय मी (1986) :
मैत्री आणि आत्मभान. स्टीफन किंग यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट बालमैत्रीचे सुंदर चित्रण करतो. मुलांच्या भावनिक आणि नैतिक प्रगल्भतेचा प्रवास दाखवणारी ही कथा फारच स्पर्श करणारी आहे.
9. फॉरेस्ट गम्प (1994) :
टॉम हॅंक्सने साकारलेली या चित्रपटातील व्यक्तिरेखा साधी आहे पण तिचं जीवन विलक्षण आहे. निष्ठा, नम्रता आणि चिकाटी या गोष्टी जीवनात किती महत्त्वाची आहेत, हे 'फॉरेस्ट गम्प' शिकवतो.
advertisement
वरील प्रत्येक चित्रपटात केवळ कथा नाही तर जीवनाचे मार्गदर्शन आहे. हे चित्रपट मुलांना आत्मभान, अपयश, सहवेदना आणि महत्त्वाकांक्षा यांचा सामना करण्यास तयार करतात. तुमच्या पाल्याला हे चित्रपट नक्की दाखवा. यामुळे त्यांना एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळण्यासह आयुष्यभर सोबत राहणारे घडेदेखील मनात रुजतील.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Movies : 'हे' 9 चित्रपट तुमच्या मुलांनी आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवे! या वीकेंडला आताच करा 1 फिक्स
Next Article
advertisement
Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement