Tere Ishq Mein : क्रिती सेननच्या हळदीत रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचला धनुष; 'तेरे इश्क में'चा डोळ्यात पाणी आणणारा टीझर आऊट!

Last Updated:

Tere Ishq Mein Teaser : क्रिती सेनन आणि धनुष अभिनीत 'तेरे इश्क में' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर आऊट झाला आहे.

News18
News18
Tere Ishq Mein Teaser : चित्रपटसृष्टीत जेव्हा एखादं मोठं नाव आणि नवा प्रोजेक्ट समोर येतो, तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा आपोआपच वाढतात. विशेषतः जेव्हा हे नाव आनंद एल. राय यांचं असतं ज्यांनी ‘रांझणा’सारखा अविस्मरणीय चित्रपट बनवला आहे. आता आनंद एल. राय पुन्हा एकदा आपल्या नवीन चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्या गाजवण्यास सज्ज आहेत. 'तेरे इश्क में' या चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'तेरे इश्क में' या चित्रपटात क्रिती आणि धनुष स्क्रीन शेअर करताना दिसतील.
या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आतुरतेने प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटाचा टीझर आऊट करण्यात आला आहे.
‘तेरे इश्क में’ ही अशी प्रेमकहाणी आहे जी आनंद एल. राय यांच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा थोडी वेगळी आहे. या चित्रपटात धनुष ‘शंकर’ नावाच्या पात्रात दिसणार आहेत, जो वायुदलात अधिकारी आहे. त्याच्या भूमिकेकडे पाहता असं वाटतं की, हा चित्रपट देशभक्ती आणि प्रेमाची एक नवी गोष्ट एकत्र मांडणार आहे. तर क्रिती सेनन ‘मुक्ती’ या भूमिकेत झळकणार असून, ती या कथानकाचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. या जोडीची केमिस्ट्री सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, कारण दोन्ही कलाकार त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात.
advertisement
चित्रपटाचा टीझर रोमँस आणि भावनांनी भरलेला आहे. टीझरच्या सुरुवातीला लग्नाचा माहोल दाखवला आहे. ज्यामध्ये क्रिती सेननचा हळदी समारंभ पार पडताना दिसत आहे. त्या समारंभात सर्वजण नाच-गाणं करत असतात आणि कृतिला हळद लावतात. याच वेळी समोरून धनुष जखमी अवस्थेत चालत येताना दिसतो त्याला पाहून क्रिती आश्चर्यचकित होते.
advertisement
क्रितीजवळ येत धनुष म्हणतो, "नवीन आयुष्य सुरू करत आहेस, जुने पाप धुऊन टाक." यानंतर तो तिच्या चेहऱ्यावर गंगाजल शिंपडतो. पुढे अरिजीत सिंगच्या आवाजात चित्रपटाच्या टायटल ट्रॅकच्या काही ओळी ऐकू येतात. ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट 28 नोव्हेंबर रोजी हिंदी आणि तमिळ भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Tere Ishq Mein : क्रिती सेननच्या हळदीत रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचला धनुष; 'तेरे इश्क में'चा डोळ्यात पाणी आणणारा टीझर आऊट!
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement