Queen of Tears ते My Demon, नेटफ्लिक्स टॉप 5 ट्रेंडिंग K-Drama, घरबसल्या कधीही पाहू शकता
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Trending K-Drama: आज काल K-Drama ची खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तर या रिलेटेड अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तरुणाईमध्ये या कोरिअन गोष्टींकडे जास्त कल पाहायला मिळत आहेत.
मुंबई : आज काल K-Drama ची खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तर या रिलेटेड अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तरुणाईमध्ये या कोरिअन गोष्टींकडे जास्त कल पाहायला मिळत आहेत. तुम्हीही जर कोरिअन ड्रामा लव्हर असाल तर Netflix वर ट्रेंडिंग असेलेले ड्रामा तुम्ही पाहू शकता.
Queen of Tears - एका कपलच्या मॅरीड लाइफमध्ये येणारी संकटं, संघर्ष आणि प्रेम यावर हा ड्रामा आधारित आहे. हा इमोशनल ड्रामा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ओटीटी नेटफ्लिक्सवर हा के-ड्रामा ट्रेंडिंग आहे. तुम्हालाही कोरिअन ड्रामा आवडतं असेल तर अजिबात मिस करु नका.
My Demon - रोमँटिक फँटसीवर आधारित हा ड्रामा आहे. यामध्ये एक राक्षस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी माणसांसोबत कॉन्ट्रॅक्ट करतो. एक तरुणी या राक्षस म्हणजेच डेमॉनच्या प्रेमात पडते. यामध्ये क्युट, फँटसी, लव्ह, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील.
advertisement
True Beauty - हा के-ड्रामा एक हायस्कूल मुलीच्या आत्मविश्वासाच्या प्रवासाची रिलेटेड आहे. ज्यामुळे किशोर वयातील प्रेक्षकांसाठी हा आवडता ठरला आहे. त्यामुळे तरुणाई हा ड्रामा जास्त पाहत आहे. ट्रेंडिंगमध्ये हा ड्रामा आहे.
Doctor Slump - हसवणूक सोडणारा हा मेडिकल ड्रामा डॉक्टरांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संघर्षांवर आधारित आहे. हा ड्रामाही ट्रेंड होत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तुम्ही Netflix वर हा पाहू शकता.
advertisement
Welcome to Samdal-ri - हा ड्रामा आहे एका शहरात राहणाऱ्या एका मुलीचा आहे. जिला आपल्या गावी परतण्याची इच्छा असते आणि तिचा स्ट्रगल, आयुष्यात येणारी संकटे अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा हा ड्रामा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2024 8:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Queen of Tears ते My Demon, नेटफ्लिक्स टॉप 5 ट्रेंडिंग K-Drama, घरबसल्या कधीही पाहू शकता