Gaurav More : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर 'ती'ची एन्ट्री, फिल्टर पाड्याच्या बच्चनला भर कार्यक्रमात चोपलं, VIDEO
Last Updated:
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' या वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत असलेल्या कार्यक्रमाचा आगामी भाग खूप खास असणार आहे. या कार्यक्रमात डॉन लोकांची पोलखोल झालेली पाहायला मिळणार आहे.
Gaurav More : 'चला हवा येऊ द्या' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात कोण सेलिब्रिटी सहभागी होणार आणि काय दंगा घालणार याची प्रेक्षकांना प्रतीक्षा असते. पण 'चला हवा येऊ द्या'च्या आगामी प्रोमोने मात्र प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. प्रोमोवरुन या आठवड्यात कोणतेही बडे सेलिब्रिटी सहभागी झालेले पाहायला मिळत नसले तरी प्रेक्षक या आगामी भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर भर कार्यक्रमात गौरव मोरेला त्याची आई बदडताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र एकच हशा पिकला आहे.
डॉन लोकांची होणार पोलखोल
झी मराठीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'चला हवा येऊ द्या'च्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गौरव मोरेची आई, प्रियदर्शन जाधवची पत्नी, भारत गणेशपुरेची पत्नी, अभिजीत खांडकेकरची पत्नी आणि मराळमोळी अभिनेत्री सुखदा, कुशल बद्रिकेची पत्नी सुनयना सहभागी झाले आहेत. त्यामुळे 'चला हवा येऊ द्या'चा आगामी भाग खूपच स्पेशल असणार आहे.
advertisement
advertisement
डॉन लोकांची पोलखोल करत येत आहेत आतले खास खबरी, असं म्हणत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये, घरातले पाहुणे भेटायला आले, सेलिब्रिटी रंगात आले असं म्हटलं गेलं आहे. दरम्यान प्रियदर्शन जाधव भर कार्यक्रमात आपल्या पत्नीला हातात फुलं घेऊन म्हणतोय,"आई-बाबा आणि साईबाबाची शपथ रोझ नाही मिळालं पण रोज प्रेम करेन". दरम्यान भारत गणेशपुरे आपल्या पत्नीसोबत डान्स करत म्हणतोय,"ज्यांना डान्स येतोय ते घाबरतील आपल्याला येतच नाही तर घाबरायचं कशाला?". पुढे गौरव मोरे आपल्या आईला म्हणतोय,"आज लय सोनं घालून आली मातोश्री". त्यावर अभिजित खांडकेकर गौरव मोरेच्या आईला म्हणतोय,"वयाच्या कितव्या वर्षापर्यंत त्याने मार खाल्लाय". या प्रश्नाचं उत्तर देत गौरवची आई म्हणते,"पाच महिने झाले. आता पण मारलं, असं म्हणत त्या गौरवचे केस ओढत त्याला भर मंचावर मारताना दिसून येत आहेत".
advertisement
फिल्टर पाड्याचा बच्चन, अशी गौरव मोरेची ओळख आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा सर्व माध्यमांवर तो आघाडीवर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gaurav More : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर 'ती'ची एन्ट्री, फिल्टर पाड्याच्या बच्चनला भर कार्यक्रमात चोपलं, VIDEO