'कातील' गौतमीच्या स्टेजवर 'किलर गर्ल' जान्हवीची एन्ट्री! 'मार्केट जाम' करत लावले ठुमके, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gautami Patil and janhavi Killekar Viral Dance : गौतमीच्या खास स्टेप्सवर जान्हवीनेही जोरदार साथ दिली. या दोघींची धमाकेदार केमिस्ट्री पाहून प्रेक्षक खुश झाले असून व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक धमाल व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि लोकप्रिय लावणी डान्सर गौतमी पाटील एकत्र स्टेजवर थिरकताना दिसत आहेत. गौतमीच्या एका डान्स शोमध्ये जान्हवीने खास हजेरी लावली होती. त्यावेळी गौतमीने तिला स्टेजवर बोलावलं आणि दोघींनी 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' या झिंगाट गाण्यावर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला.
गौतमीच्या खास स्टेप्सवर जान्हवीनेही जोरदार साथ दिली. या दोघींची धमाकेदार केमिस्ट्री पाहून प्रेक्षक खुश झाले असून व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ लाखोंची पसंती मिळत आहे.
जान्हवी किल्लेकरने बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये 'किलर गर्ल' म्हणून ओळख मिळवली. तिचं बिनधास्त वागणं आणि स्पष्ट बोलणं यामुळे ती प्रेक्षकांची लाडकी ठरली. शो संपल्यानंतर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती रील्स, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांशी सतत कनेक्ट राहते. सध्या ती विविध इव्हेंट्स आणि स्टेज शोमध्ये भाग घेत आहे.
advertisement
गौतमी पाटीलच्या नव्या शोची तयारी
गौतमी पाटील ही सध्या महाराष्ट्रातील नंबर 1 डान्सर मानली जाते. तिच्या शोला हजारोंच्या संख्येने प्रेक्षक गर्दी करतात. 'पाटलांचा बैल गाडा' आणि 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' ही तिचं हिट गाणी ठरली आहेत. सध्या गौतमी महाराष्ट्रभर दौरे करत आहे आणि तिचे प्रत्येक शो हाऊसफुल्ल होतात. डान्ससोबतच आता ती स्टार प्रवाहवरील 'शिट्टी वाजली' या नव्या कुकिंग शोमध्येही दिसणार आहे.
advertisement
advertisement
प्रेक्षकांकडून दोघींना भरभरून प्रेम
जान्हवी आणि गौतमी यांच्या या धमाकेदार डान्स व्हिडीओला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. "स्टेज पेटवला रे", "जान्हवीचा डान्स फाडू होता", अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत. दोघींच्या जोडीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांना भविष्यात दोघींचं असंच एकत्र परफॉर्मन्स पुन्हा पाहायला मिळावं, अशी अपेक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 21, 2025 9:20 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कातील' गौतमीच्या स्टेजवर 'किलर गर्ल' जान्हवीची एन्ट्री! 'मार्केट जाम' करत लावले ठुमके, VIDEO